Maratha Reservation | ‘मग आम्ही रस्त्यावर उतरु’, ‘या’ राजकीय नेत्याचा छगन भुजबळांना इशारा
Maratha Reservation vs Obc | मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्यावरुन आता राजकीय नेते आपसात भिडू लागल्याच चित्र आहे. छगन भुजबळ यांनी ठाम भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी ठरवून आरक्षण देऊ नये, असं छगन भुजबळ यांचं मत आहे.
मुंबई (गिरीश गायकवाड) : मराठा समाजाला OBC कोट्यातून आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी ठरवून आरक्षण देऊ नये, अशी छगन भुजबळ यांची भूमिका आहे. छगन भुजबळ यांनी ठाम भूमिका घेतली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत. छगन भुजबळ यांनी या विषयात एक ठाम भूमिका घेतली आहे. आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी OBC समाजातील विविध नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी छगन भुजबळ यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊ नये, त्यांनी सरकारमध्ये राहून संघर्ष करावा. आम्ही बाहेर राहून संघर्ष करु असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार प्रकाश शेंडगे म्हणाले. दिवाळीनंतर राज्यात ओबीसींच मोठ आंदोलन, मेळावे होणार आहेत. ओबीसी समाजही त्यांच्या आरक्षणाच संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. कारण मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास आधीपासून जे ओबीसीमध्ये आहेत, त्यांचा वाटा कमी होईल.
“विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाच्या विरोधातला अजेंडा राबवत आहेत, यामुळे समाजात तेढ निर्माण होईल. आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल” असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. “छगन भुजबळ आणि सरकारची भूमिका ही एक समान वाटत नाहीये. काल देखील बीडमध्ये जाऊन त्यांनी जे विधान केलं, ते आगीत तेल टाकणार आहे. छगन भुजबळ यांना आगीमध्ये तेल टाकायची काही गरज नाही” असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
‘तो देखील माणूसच’
“जर न्यायाधीश त्या ठिकाणी जात असतील, तर न्यायाधीश हे देखील व्यक्ती म्हणूनच त्या ठिकाणी गेलेत. तो देखील माणूसच आहे. सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी हवे ते प्रयत्न करत असताना दुसरीकडे छगन भुजबळ यांची अशी वक्तव्य समाजामध्ये दुफळी माजवणारी आहेत” असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.