विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वात मोठी कारवाई, तपासणी नाक्यावर चार कोटींचे सोने जप्त

Police action at the checkpoint: सीमा नाक्यावर सीसीटीव्हीही बसवण्यात आले आहे. आता रविवारी विदर्भात मोठी कारवाई झाली आहे. मध्यप्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवर 3 कोटी 91 लाख रुपयेचे सोने जप्त करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वात मोठी कारवाई, तपासणी नाक्यावर चार कोटींचे सोने जप्त
gold (file Photo)
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 5:47 PM

Police action at the checkpoint: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. आता प्रचार सभांचा धडाका सुरु होणार आहे. त्याचवेळी निवडणूक आयोग सक्रीय झाला आहे. निवडणुकीत गैरप्रकार टाळण्यासाठी आयोगाने धडक नियोजन केले आहे. उमेदवारांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष असणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यातील सीमेवर तपासणी पथक तयार केले आहे. त्याचवेळी आंतरराज्य सीमेवर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

दुसऱ्या राज्यातून अवैध वाहतुकीवर निर्बंध आणले आहे. तसेच सीमा नाक्यावर सीसीटीव्हीही बसवण्यात आले आहे. आता रविवारी विदर्भात मोठी कारवाई झाली आहे. मध्यप्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवर 3 कोटी 91 लाख रुपयेचे सोने जप्त करण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाचे २४ तास लक्ष

विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या सीमा तपासणी नाक्यावर धडक कारवाई करण्यात आली. या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी तपासणी करताना 3 कोटी 91 लाखांचे सोने जप्त केले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा २०२४ ची निवडणूक जाहीर झाली. त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागली. निवडणूक आयोगा सक्रीय झाला. प्रशासनाने ठिकाठिकाणी तपासणी नाके तयार केले. तपासणी नाक्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक गाडीवर लक्ष ठेवले जात आहे. संशय येताच तपासणी केली जात आहे. त्याप्रमाणे तपासणी करताना सोने जप्त करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

सीमेवरील चौकशी पथक २४ तास लक्ष  ठेवत आहे. जप्त केलेले सोने कोणाचे आहे? ते सोने कोठून येत होते? याबाबत अद्याप काहीच माहिती मिळाली नाही. या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे.

एक कोटींची दारु अहिल्यानगरमध्ये जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक कोटी दोन लाखाची विदेशी दारू जप्त केली आहे. गोवा राज्यातील मडगाव येथून इंदौर, मध्य प्रदेशला विदेशी दारू घेऊन जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या आधारे बायपास रोडवरील अरणगाव शिवारात सापळा लावून हा ट्रक ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी दीपक पाटील, शहाजी पवार, शैलेश जाधव या तीन जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या आरोपींची कसून चौकशी करून या विदेशी दारूचे मध्यप्रदेश कनेक्शनच्या मुळाशी जाणार असल्याचं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी.
'अयोध्येच्या निकालावेळी देवापुढे बसलो अन्...',सरन्यायाधीश काय म्हणाले
'अयोध्येच्या निकालावेळी देवापुढे बसलो अन्...',सरन्यायाधीश काय म्हणाले.
भाजपच्या पहिल्याच यादीत या 99 उमेदवारांना वर्णी, बघा कोणाला संधी
भाजपच्या पहिल्याच यादीत या 99 उमेदवारांना वर्णी, बघा कोणाला संधी.
मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार?
मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार?.
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटणार? शरद पवार करणार मध्यस्थी?
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटणार? शरद पवार करणार मध्यस्थी?.
मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, 'बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे...
मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, 'बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे....
कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर लढणार?लवकरच शिंदे गटात प्रवेश
कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर लढणार?लवकरच शिंदे गटात प्रवेश.
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर.
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्...
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्....
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट.