ED raids on Pratap Sarnaik | पाच तासाच्या चौकशीनंतर अखेर विहंग सरनाईक ईडी कार्यालयातून बाहेर; उद्या पुन्हा चौकशी?

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक अखेर पाच तासाच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले आहेत. (vihang sarnaik Comes Out of ED Office After Long Questioning)

ED raids on Pratap Sarnaik | पाच तासाच्या चौकशीनंतर अखेर विहंग सरनाईक ईडी कार्यालयातून बाहेर; उद्या पुन्हा चौकशी?
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 8:39 PM

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर आज सकाळी धाड टाकल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर तब्बल पाच तास प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली असून त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं आहे. ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर विहंग यांनी थेट घर गाठले. त्यांनी मीडियाला कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. (vihang sarnaik Comes Out of ED Office After Long Questioning)

ईडीने आज पहाटे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि दहा ठिकाणांवर हे छापे मारले होते. सरनाईक यांचे चिरंजीव विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावरही छापे मारण्यात आले. यावेळी ईडीने सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयातील कागदपत्रे, मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेतले. तब्बल चार तासांच्या धाडसत्रानंतर ईडीने दुपारी 3 वाजता विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं होतं.

त्यानंतर विहंग यांना ईडी कार्यालयात आणून त्यांची तब्बल पाच तास चौकशी केली. यावेळी त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगसह त्यांचे व्यवसाय आणि उत्पन्नाचे स्त्रोत या अनुषंगाने प्रश्नांचा भडिमार केल्याचं सूत्रांनी सांगितलं. पाच तासांच्या प्रश्नांच्या सरबत्तीनंतर विहंग यांना सोडून देण्यात आलं. ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यावर विहंग यांनी मीडियाला कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी थेट घर गाठले. त्यामुळे ईडीने त्यांना काय प्रश्न विचारले हे गुलदस्त्यात आहे. (vihang sarnaik Comes Out of ED Office After Long Questioning)

दरम्यान, ईडीने ठाण्यातील हिरानंदानी येथील प्रताप सरनाईक यांच्या 23व्या मजल्यावरील घरावर, वर्तकनगरमधील कार्यालयावर आणि घोडबंदर रोडवरील विहंगम हॉटेलवर आज सकाळी धाड मारली. त्याच बरोबर सरनाईक यांच्या विहंग आणि पूर्वेश या दोन्ही चिरंजीवांच्या कार्यालय आणि घरावरही धाड मारली. ईडीने सरनाईक यांच्या एकूण दहा ठिकाणांवर धाड मारली आहे. ही धाड मारण्यापूर्वी ईडीने पूर्ण तयारी केली होती. ईडीने पोलिसांसह स्थानिक प्रशासनालाही या धाडीचा सुगावा लागू दिला नाही.

10 कंपन्यांची माहिती घेतली, उद्या पुन्हा चौकशी?

ईडीने आजच्या चौकशीत विहंग यांच्याकडून त्यांच्या 10 कंपन्यांची प्राथमिक माहिती घेतली. या कंपन्यांचे सर्व व्यवहार तपासले जाणार आहेत. सरनाईक यांच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून एक प्रश्नावली तयार केली जाणार असून त्यानुषंगाने विहंग यांना पुन्हा प्रश्न विचारण्यात येणार आहेत. तसेच विहंग यांना उद्या परत चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सरनाईक-राऊत भेट

ईडीच्या धाडसत्रानंतर तब्बल अकरा तासाने प्रताप सरनाईक यांनी दैनि्क ‘सामना’चं कार्यालय गाठून शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल दीड तास बंद दाराआड या दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा तपशील सांगण्यास सरनाईक यांनी नकार दिला. ईडीने का आणि कशासाठी धाड मारली हे मला माहीत नाही. मीच त्याची माहिती घेत आहे, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना सरनाईक यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचं सांगितलं. सरनाईक यांच्याशी बोलणं झालं असून त्यांनी काहीही चुकीचं केलं नसल्याची माझी खात्री पटली आहे, असंही ते म्हणाले. केवळ अन्वय नाईक प्रकरण लावून धरल्यामुळे सरनाईक यांच्यावर आकसाने कारवाई करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. (vihang sarnaik Comes Out of ED Office After Long Questioning)

संबंधित बातम्या:

प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई योग्यच; सोमय्यांकडून समर्थन

विहंग आणि पूर्वेशची ईडीकडून समोरासमोर बसून चौकशी होणार?

‘सरनाईक, वायकर हा तर मुखवटा, खरा कलाकार कलानगरमध्ये!’, ईडी कारवाईवरुन आमदार नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांकडे सूचक इशारा

(vihang sarnaik Comes Out of ED Office After Long Questioning)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.