बारामतीमधून लोकसभा लढवणार का? विजय शिवतारे यांनी जाहीर केला निर्णय
lok sabha election 2024 : लोकसभेसाठी आता लोक सांगत आहेत की माघार घेऊ नका. लोक मला कानात सांगतात ही त्यांची भीती आहे. यामुळे आता पर्याय हवा आहे. मतदार संघातून पवार रुपी हुकुमशाही संपवण्यासाठी आता माझे धर्मयुद्ध आहे. मोठे मोठे राजकीय पुढारी सांगत होते की मी काय करणार आहे.
बारामती लोकसभा मतदार संघाबाबत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी भूमिका जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन वेळा झालेल्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वेगळी भूमिका त्यांनी रविवारी मांडली. बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी जाहीर केली. १२ एप्रिलला १२ वाजता आपण लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले. यामुळे बारामतीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या लढाईत आता विजय शिवतारे आले आहेत.
तरुणांनी निवडणूक सांभाळली
विजय शिवतारे यांनी रविवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर लोकसभा लढवण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, आज संपूर्ण 6 विधानसभा मतदार संघातील सर्वांना बोलावले होते. सर्व प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. मी 2008 साली मुंबईवरुन पुरंदरला आलो. मी आमदारकी लढण्यासाठी इथं आलो. मी आमदारकी लढण्यासाठी इथं आलो. यामुळे जेव्हा मी आलो तेव्हा सर्व तरुणांनी माझी निवडणूक हातात घेतली होती.
लोकांमध्ये त्यांची भीती
लोकसभेसाठी आता लोक सांगत आहेत की माघार घेऊ नका. लोक मला कानात सांगतात ही त्यांची भीती आहे. यामुळे आता पर्याय हवा आहे. मतदार संघातून पवार रुपी हुकुमशाही संपवण्यासाठी आता माझे धर्मयुद्ध आहे. मोठे मोठे राजकीय पुढारी सांगत होते की मी काय करणार आहे. पण मी आमदार झालो तेव्हा 25 हजार मतांनी मी जिंकलो. सगळ्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला.
१ एप्रिल रोजी सभा
विजय शिवतारे यांनी सांगितले की, जाहीरपणे नाही तर मनातून सर्व पक्षीय नेते माझ्यासोबत आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनाही सांगतो की त्यांनी मला आशीर्वाद द्यावे. अनेक लोक माझ्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे लोक देखील माझ्या समोर आहे. अजित पवार यांचे राजकारण स्वार्थाचे आहे. आता 1 तारखेला सभा घेणार आहे. माझी लढाई म्हणजे जन सामन्यांची लढाई आहे. यामुळे या सभेला 50 ते 60 हजार लोकांची उपस्थिती असणार आहे. त्यानंतर सगळ्या विधानसभा मतदार संघात सभा घेणार आहे. 12 तारखेला 12 वाजता मी फॉर्म भरणार आहे.