एखाद्या नाचीनं महात्मा गांधींवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं, मंत्री विजय वडेट्टीवारांनी कंगनाला फटकारलं

कंगना रनौतनं महात्मा गांधींवर बोलणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं आहे. अशा शब्दात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कंगना रनौतचा समाचार घेतला. मात्र कंगनावर अशा शब्दात केलेली टिप्पणी मंत्री वडेट्टीवार यांना भोवण्याची शक्यता आहे. 

एखाद्या नाचीनं महात्मा गांधींवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं, मंत्री विजय वडेट्टीवारांनी कंगनाला फटकारलं
मंत्री वडेट्टीवार यांची कंगना रनौतवर सडकून टीका
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 5:30 PM

मुंबईः देशाचे स्वातंत्र्य आणि महात्मा गांधींवर वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतला काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चांगलंच फटकारलं आहे. महात्मा गांधींवर भाष्य करण्याची कंगना रनौतची लायकी तरी आहे का, असा सवाल त्यांनी केला. एखादी नाची महात्मा गांधींवर बोलतेय. आज कंगना रनौतबद्दल लोक काय बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कंगना रनौतनं महात्मा गांधींवर बोलणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं आहे. अशा शब्दात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कंगना रनौतचा समाचार घेतला. मात्र कंगनावर अशा शब्दात केलेली टिप्पणी मंत्री वडेट्टीवार यांना भोवण्याची शक्यता आहे.

वादग्रस्त वक्तव्याने कंगना रनौत चर्चेत

बॉलीवूड क्वीन कंगना रनौत सध्या महात्मा गांधींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे राजकीय हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे. कंपनाने मंगळवारी एका वक्तव्यात म्हटले की, सुभाष चंद्र बोस आणि भगत सिंह यांना महात्मा गांधींनी पाठिंबा दिला नाही. त्यापुढे ती म्हणाली की, दुसरा गाल पुढे केल्याने स्वातंत्र्य मिळत नाही तर भीक मिळते. खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर मिळाले. इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे कंगना रनौत सध्या चर्चेत आहे.

‘साहेबांच्या स्मृतीस्थळावर ऊर्जा मिळते’

दादर येथील शिवाजी पार्कवर आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर भेट दिल्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही प्रतिक्रिया दिल्या. साहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यावर एक वेगळीच शक्ती आणि ऊर्जा मिळते. याठिकाणी आल्यावर जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

रझा अकादमी आणि भाजपची हातमिळवणी झाल्याचं कळतंय

अमरावती येथील दंगलीप्रकरणी प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी सावधगिरीने वक्तव्य केलं. रझा अकादमी आणि भाजपची हातमिळवणी झाल्याचं कळतंय. माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनीही बरीच प्रक्षोभक वक्तव्ये केली आणि ते घरी जाऊन झोपले. याचे परिणाम शहराला भोगावे लागले. त्रिपुरा घटनेनंतर जो मोर्चा निघाला, तो अनधिकृत होता. अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.

इतर बातम्या-

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला अण्णा हजारेंचं पाठबळ, मुख्यमंत्र्यांशी करणार पत्रव्यवहार

भाजपच्या नामनिर्देशित सदस्याला स्थायी समितीतून हटवण्यासाठी 1 कोटीची उधळपट्टी; बीएमसीचा अजब कारभार चव्हाट्यावर

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.