AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोंदियातील कोरोना बळींमध्ये बाहेरील राज्यातील रुग्ण सर्वाधिक; वडेट्टीवारांचं मोठं विधान

गोंदियातील वैद्यकिय महाविद्यालयात काल 29 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ऑक्सिजन अभावी 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती काल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. (vijay wadettiwar denied 29 Corona patients died due to Oxygen Shortage in Gondia)

गोंदियातील कोरोना बळींमध्ये बाहेरील राज्यातील रुग्ण सर्वाधिक; वडेट्टीवारांचं मोठं विधान
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 5:56 PM

गोंदिया: गोंदियात कोरोनामुळे 29 जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हे सर्व रुग्ण केवळ गोंदियातील नसून बाहेरच्या राज्यातील आहेत, असं सांगतानाच गोंदियात उपचार घेण्यासाठी बाहेरच्या राज्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर येत आहेत, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. (vijay wadettiwar denied 29 Corona patients died due to Oxygen Shortage in Gondia)

गोंदियातील वैद्यकिय महाविद्यालयात काल 29 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ऑक्सिजन अभावी 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती काल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र हे वृत्त खोटे असल्याचा दावा हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे. स्वत: विजय वडेट्टीवार यांनी गोंदियातील 29 मृतांमध्ये बाहेरील राज्यातील लोकांचा समावेश असल्याचं म्हटलं आहे. तसेच ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचं वृत्त खोटं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मध्यप्रदेशातील रुग्ण

गोंदियात लगत असलेल्या मध्यप्रदेशातून कोरोनाचे गंभीर रुग्ण उपचारासाठी गोंदियात येतात. खासगी रुग्णालये गंभीर रुग्णांना भरती करून घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे रुग्णांना शासकीय रुग्णालयात दाखल केले जात आहे. गंभीर आजारी असलेले रुग्ण रुग्णालयात उशिराने उपचारासाठी येतात. त्यामुळे त्यांना वाचवणे कठिण जाते, असं वडेट्टीवार म्हणाले. मात्र, काल दगावलेले सर्वच्या सर्व 29 रुग्ण गोंदियातील नाहीत. मध्यप्रदेशातील रुग्णांचाही त्यात समावेश आहे, असंही त्यांनी सांगितलं.

रुग्णांच्या नातेवाईकांचा दावा

त्या दिवशी गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनसाठी मोठी धावपळ करावी लागली होती. कारण रुग्णालयातील ऑक्सिजनच संपल्याने ऑक्सिजनसाठी रुग्ण तळफडू लागली होती. रुग्णाचे नातेवाईक ऑक्सिजनसाठी टाहो करीत होते. तब्बल अर्धा तास ऑक्सिजनचा पुरवठा बंद असल्याने ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावले आहेत, असं मृत कोरोनाबाधित महिलेचा भाऊ खेमचंद लांजेवार यांनी सांगितलं.

प्रशासन सत्य का लपवत आहे?

जर रूग्णांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगत आहेत. तर प्रशासन सत्य लपवून सारवासारव का करत आहे? विजय वडेट्टीवारांना मृतकांमध्ये परराज्यातील रुग्णांचा समावेश असल्याची खोटी माहीती जिल्हा प्रशासनाने का दिली?, असे सवाल येथील नागरिक करत आहेत. (vijay wadettiwar denied 29 Corona patients died due to Oxygen Shortage in Gondia)

संबंधित बातम्या:

रेमडेसिवीरच्या नावाने पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे पाणी, 35 हजारांना बनावट इंजेक्शची विक्री, बारामतीत टोळीचा पर्दाफाश

कोरोनाची तिसरी लाट कधीही उसळेल, कायमस्वरुपी नियोजन करा, उद्धव ठाकरेंचं उद्योगांना आवाहन

आरोप सिद्ध करा, नाही तर राजीनामा द्या; दरेकरांचं नवाब मलिकांना आव्हान

(vijay wadettiwar denied 29 Corona patients died due to Oxygen Shortage in Gondia)

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.