Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी गोपीनाथ मुंडेंचा शिष्य, पंकजांना वडेट्टीवार म्हणतात, आपण गुरुबंधू, वाचा ओबीसी परिषदेत काय घडतंय?

आजच्या समारोपाच्या कार्यक्रमात मंत्री वडेट्टीवार,भाजपा नेत्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात अभावानेच दिसणारं चित्रं लोणावळ्यात पहायला मिळालं.

मी गोपीनाथ मुंडेंचा शिष्य, पंकजांना वडेट्टीवार म्हणतात, आपण गुरुबंधू, वाचा ओबीसी परिषदेत काय घडतंय?
vijay wadettiwar
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 6:24 PM

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर काल भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांनी आंदोलन केलं. त्यानंतर आज लोणावळ्यात ओबीसींची परिषद (OBC conference) भरलीय. त्यातही सर्व पक्षाते ओबीसीचे नेते एकत्र आलेले आहेत.आजच्या समारोपाच्या कार्यक्रमात मंत्री वडेट्टीवार,भाजपा नेत्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात अभावानेच दिसणारं चित्रं लोणावळ्यात पहायला मिळालं. ह्या नेत्यांच्या भाषणातखरं मन जिंकलं ते वडेट्टीवारांनी. त्यांनी स्वत:च्या प्रदेशाध्यक्षाच्या समोर मनातली खदखद बोलून दाखवली. सोबत विरोधी पक्षातल्या नेत्यांनाही साद घातली. (Vijay Wadettiwar said I am disciple of Gopinath Munde know what happened in OBC conference)

काय म्हणाले वडेट्टीवार?

गोपीनाथ मुंडे हे राज्यातले भाजपचे सर्वोच्च नेते राहीलेले आहेत. आता जे कुणी ओबीसी नेते सर्वच पक्षात स्वत:ला मोठं म्हणून घेतायत त्यांनी गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष पाहिलेला आहे. पंकजा मुंडे त्यांचाच वारसा सांगत असतात. आज तोच धागा पकडत ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पंकजांना गुरुबंधू म्हटलं. वडेट्टीवार म्हणाले-पंकजा ताई ह्या आमच्या ताई आहेत. ज्यांना मी गुरु मानतो. मानत होतो, माझे गुरु, ज्यांनी मला ओबीसी चळवळीची दिशा दिली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब, त्यांच्या कन्या, खरं तर मी मुंडे साहेबांचा शिष्य. मुंडे साहेबांच्या कन्या म्हणजे आम्ही गुरुबंधू. पंकजा ताई हा तोच वसा ओबीसी चळवळीत काम करुन पुढे चालवत आहेत असं वडेट्टीवार म्हणाले.

आणि अमर रहे अमर रहेच्या घोषणा लागल्या

लोणावळ्यातलं शिबिर होते, ‘ओबीसी व्हीजेएनटी चिंतन मंथन शिबीर’. व्यासपीठावर पिवळे फेटे घातलेल्या नेत्यांची संख्या बऱ्यापैकी होती. पंकजा मुंडे ह्या एकमेव महिला ओबीसी नेत्या व्यासपीठावर होत्या. विजय वडेट्टीवार भाषणाला उभे ठाकले. ते पंकजा मुंडेंबद्दल बोलायला लागले. जेव्हा गोपीनाथ मुंडे यांचं नाव वडेट्टीवारांनी घेतलं, त्याच वेळेस श्रोत्यांमधल्या कार्यकर्त्यांनी अमर रहे, अमर रहे गोपीनाथमुंडे अमर रहेच्या घोषणा केल्या. घोषणाबाजी सुरु असताना वडेट्टीवारांनी काही वेळ बोलणं बंद ठेवलं आणि नंतरच भाषण पूर्ण केलं.

वडेट्टीवारांची खदखद

व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते. त्यांच्यासमोरच वडेट्टीवारांची खदखद बाहेर पडली. राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो, सत्ता आली त्यावेळेस महसूल मंत्रिपद तरी मिळेल असं वाटलं होतं. पण केवळ ओबीसी म्हणून मला ओबीसी खातं मिळालं. पंकजा मुंडेंनाही ग्रामीण विकास मंत्रीपद मिळालं असं वडेट्टीवार म्हणाले. म्हणजेच आपण फक्त ओबीसी आहोत म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदं मिळतात असा दावाच वडेट्टीवारांनी केला.

इतर बातम्या :

ओबीसी चिंतन बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांचं विचारमंथन, ओबीसी आरक्षणासाठीचे महत्वाचे ठराव, जाणून घ्या सविस्तर

‘गोपीचंद पडळकर बांडगुळ, अशी बांडगुळं वाढत आहेत’, शिवसेना आमदार मनिषा कायंदेंचा घणाघात

‘संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा; खातो शिवसेनेचं पण निष्ठा शरद पवारांवर’

(Vijay Wadettiwar said I am disciple of Gopinath Munde know what happened in OBC conference)

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.