शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास ग्रामस्थांचा विरोध, ग्रामस्थांनी मंडप जाळून उखडून टाकला

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होऊ घातलेल्या बांदा-दाणोली रस्ता कामास विरोध करत तिथं उभारलेला मंडप स्थानिकांनी जाळून टाकला आहे. कोल्हापूर आणि गोव्याला जोडणाऱ्या बांदा-दाणोली या राज्य मार्गाला स्थानिकांकडून विरोध करण्यात आला आहे.

शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास ग्रामस्थांचा विरोध, ग्रामस्थांनी मंडप जाळून उखडून टाकला
शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास ग्रामस्थांचा विरोध, ग्रामस्थांनी मंडप जाळून उखडून टाकला
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 6:26 PM

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल पुढच्या आठवड्यात वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून सध्या विकासकामांच्या उद्घाटनांचा आणि भूमीपूजनांचा धडाकाच सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच कोट्यवधी रुपयांचा विकासकामांचं भूमीपूजन पार पडलं. तसेच राज्य सरकारकडून राज्यभरात अशा प्रकारचे विविध विकाकामांचे भूमीपूजन केले जात आहे. पण काही वेळेला विकासकामांना स्थानिकांचा विरोध होत असतो. स्थानिकांच्या काही मागण्या असतात. त्यासाठी स्थानिक अनेकदा आक्रमक होताना दिसतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत अशीच काहीशी घटना घडली आहे. शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास ग्रामस्थांचा विरोध होता. त्यामुळे ग्रामस्थांनी थेट कार्यक्रमाचा मंडप जाळून उखडून टाकला आहे.

नेमकं प्रकरण काय?

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होऊ घातलेल्या बांदा-दाणोली रस्ता कामास विरोध करत तिथं उभारलेला मंडप स्थानिकांनी जाळून टाकला आहे. कोल्हापूर आणि गोव्याला जोडणाऱ्या बांदा-दाणोली या राज्य मार्गाला स्थानिकांकडून विरोध करण्यात आला आहे. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कार्यक्रमाचे भूमिपूजन होऊ देणार नाही, असा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रातोरात ग्रामस्थांकडून बैठक घेऊन त्या ठिकाणी उभारण्यात आलेला मंडप काढून टाकण्यात आला.

केसरकरांनी घेतली स्थानिकांची भेट

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सावंतवाडी शहराला पर्यायी रस्ता ठरणाऱ्या बांदा-दाणोली या रस्त्याला 128 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या कामाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार होते. दरम्यान आज दुपारी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.