मराठा संघटनांवर सरकारच्या अपयशाचं खापर?, आरक्षणावर विनायक मेटे काय म्हणाले?

शनिवारी होणाऱ्या मराठा संघटनाच्या बैठकीला हजर राहण्याचे आवाहन विनायक मेटे यांनी केले. (Vinayak Mete Maratha reservation)

मराठा संघटनांवर सरकारच्या अपयशाचं खापर?, आरक्षणावर विनायक मेटे काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 9:47 PM

मुंबई :मराठा आरक्षणाबातत सर्वोच्च न्यायालयात 25 जानेवारीपासून सुनावणी होणार आहे. मराठा समाजात या सगळ्याबाबत संशयाचं वातावरण आहे. जर काही कमी जास्त झालं तर इतिहास माफ करणार नाही. सरकारमध्ये एकी नसल्यामुळे मराठा समाजावर अशी परिस्थिती आहे” अशी घणाघाती टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली. तसेच, शनिवारी ( 20 डिसेंबर) मराठा संघटनांची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला हजर राहण्याचेही आवाहन त्यांनी सर्व मराठा संघटनांना केले. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Vinayak Mete on meeting of Maratha Organization and Maratha reservation)

यावेळी त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. “मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात 25 जानेवारीपासून सुनावणी सुरु होणार आहे. मराठा समाजात या सर्वाबाबत संशयाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत जर काही कमी जास्त झालं तर इतिहास माफ करु शकणार नाही. सरकारमध्ये एकी नसल्यामुळे मराठा समाजावर अशी परिस्थिती आली आहे,” असे विनायक मेटे म्हणाले.

सरकारच्या अपयशाचं खापर मराठा संघटनांवर?

मराठा आरक्षण तसेच, इतर प्रश्नांना घेऊन मराठा संघटनांची शनिवारी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला सर्व मराठा संघटनांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मेटे यांनी केले. तसेच, सरकार त्यांच्या अपयशाचं खापर मराठा संघटनांवर फोडू पाहत आहे, असा आरोपही मेटे यांनी केला. “समाजाच्या हितासाठी सर्व मराठा संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे. राज्य सरकार त्यांच्या अपयशाचे खापर मराठा संघटनांवर फोडू पाहत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे,” असे विनायक मेटे म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याच्या राज्य सरकारच्या मागणीवर घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. “मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही,” असे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 13 डिसेंबर रोजी केले होते. तर, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 डिसेंबर रोजी दिले होते. तसेच, त्यांनी विरोधकांनी या मुद्द्यावर राजकारण न करण्याचेही आवाहन केले होते. त्यानंतर आता शनिवारी मुंबईत मराठा संघटनांची बैठक होणार आहे. या बैठकीत काय चर्चा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठऱणार आहे.

संबंधित बातम्या :

मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही, समाजाचं नुकसान होऊ नये हीच प्रमाणिक भावना : अशोक चव्हाण

फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्या, तीन महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची, नितेश राणेंचा दावा

(Vinayak Mete on meeting of Maratha Organization and Maratha reservation)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.