नोकरभरती ते मेडिकल प्रवेश, विनायक मेटेंच्या मुख्यमंत्र्यांकडे 9 मागण्या
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी घटनापीठ स्थापन करण्यासाठी युद्ध पातळींवर प्रयत्न करा. | Vinayak Mete
मुंबई: आरक्षणाच्या मागणीसाठी मातोश्रीवर काढण्यात येणाऱ्या मशाल मोर्चापूर्वी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्राद्वारे संवाद साधला आहे. या पत्राद्वारे विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे नऊ मागण्या केल्या आहेत. यामध्ये नोकरभरती, मेडिकल प्रवेश यासारख्या मुद्द्यांचा अंतर्भाव आहे. (Vinayak mete sent letter to CM Uddhav Thackeray for Maratha reservation)
आज संध्याकाळी मराठा आंदोलकांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी नाकारली जाऊ शकते. त्याऐवजी आंबेडकर उद्यानाच्या परिसरात हे आंदोलन व्हावे, असा पोलिसांचा आग्रह आहे. यासंबंधी सध्या पोलीस आणि मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु असल्याचे समजते.
या पार्श्वभूमीवर आज सकाळीच विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. बाळासाहेबांच्या काळात लोकं मातोश्रीवर गाऱ्हाणं घेऊन जायची. मात्र, आज मुख्यमंत्री मातोश्रीवर कोणी येऊ नये म्हणून बंदोबस्त करतात. सरकारकडून मराठा मोर्चेकऱ्यांना नोटीस पाठवण्याचे षडयंत्र केले जातेय. हा रडीचा डाव असल्याची टीका, विनायक मेटे यांनी केली होती.
विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केल्या विविध मागण्या खालीलप्रमाणे:
1. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी घटनापीठ स्थापन करण्यासाठी युद्ध पातळींवर प्रयत्न करा.
2. SEBC आरक्षण जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत मराठा समाजाला सवलती द्या.
2. वयाच्या आणि इतर अटी आणि शर्ती शितील करा.
4.मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा मुलांना स्थान द्या.
5.अकरावी आणि इतक तांत्रिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा.
6. 2014 ची ESBC आणि 2018-19-20 च्या SEBC मधील मराठा तरूणांची नोकरभरती पूर्ण करा.
7. हिंगनघाट,रायगड येथील पिडीत कुटुंबीयांनाच न्याय मिळवून द्या.
8. कोपर्डी घटनेतील आरोपींना फासावर लटकवण्यासाठी सरकार ने प्रयत्न करावे आणि पिडीत कुटुंबीयांना न्याय मिळवून द्या.
9. मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हा सरसकट मागे घ्या.
संबंधित बातम्या:
मराठा क्रांती मशाल मार्चची नियमावली, शांततेत मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
मातोश्रीवर मोर्चा घेऊन जाणारच, परवानगी नाकारुन उद्धव ठाकरे रडीचा डाव खेळतायत: विनायक मेटे
(Vinayak mete sent letter to CM Uddhav Thackeray for Maratha reservation)