Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार गोट्या खेळतंय का?; मराठा आरक्षणावरून मेटेंचा संतप्त सवाल

विनायक मेटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. (vinayak mete slams maha vikas aghadi over maratha reservation)

सरकार गोट्या खेळतंय का?; मराठा आरक्षणावरून मेटेंचा संतप्त सवाल
विनायक मेटे,नेते, शिवसंग्राम
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 2:58 PM

मुंबई: मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी संताप व्यक्त केला आहे. 25 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार होती. ही सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली गेली आहे. सुनावणी का पुढे ढकलली गेली? महाविकास आघाडी सरकार गोट्या खेळतंय का? असा संतप्त सवाल विनायक मेटे यांनी केला. (vinayak mete slams maha vikas aghadi over maratha reservation)

विनायक मेटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. मराठा आरक्षणावरून सरकार वेळकाढूपणा करत आहे. सरकारचा हा वेळकाढूपणा आम्ही खपवून घेणार नाही, असं सांगतानाच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि मंत्री वर्षा गायकवाड यांच्या जिल्ह्यात, मतदारसंघात जाऊन या मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची सुरुवात राजेश टोपे यांच्या जालन्यातून करण्यात येणार असल्याचं मेटे यांनी सांगितलं.

नोकरभरती पुढे ढकला

यावेळी मेटे यांनी मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत नोकरभरती पुढे ढकलण्याची मागणी केली. तसेच कोर्टात अर्ज सादर करणाऱ्या एमपीएससीच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. एमपीएससीचा भरती विरोधातील अर्ज ही जातीयवादी भूमिकाच आहे. मराठा समाजात सरकारच्या धोरणांवर असंतोष आहे, असंही त्यांनी सांगितलं.

एमपीएससीने मराठा उमेदवारांना ‘एसइबीसी’ऐवजी आर्थिक मागास समाजाचे आरक्षण देता येणार नाही, असा अर्ज बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करून राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेतली होती. राज्य सरकारला अंधारात ठेवून एमपीएससीने हा अर्ज कोर्टात सादर केला होता. त्यामुळे मराठा नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याशिवाय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या वादाचे पडसाद उमटले होते. त्यानंतर आज एमपीएससीने बॅकफूटवर जात कोर्टातून अर्ज मागे घेण्याच्या सूचना वकिलांना दिल्या आहेत. (vinayak mete slams maha vikas aghadi over maratha reservation)

संबंधित बातम्या:

एमपीएससीला सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकारच नाही; मराठा आरक्षणाचा वाद चिघळणार?

सरकारचा मोठा निर्णय, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार, वाचा सविस्तर

सरकारला अंधारात ठेवून MPSC ची न्यायालयात याचिका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भडकले

तुम्हा सर्वांना मी लवकरच भेटणार आहे, ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज ठाकरे यांचं पहिलं ट्विट

(vinayak mete slams maha vikas aghadi over maratha reservation)

'काका आहे का गं?' बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा tv9 मराठीवर...
'काका आहे का गं?' बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा tv9 मराठीवर....
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.