Vinayak Mete : सस्पेन्स..! मेटेंचा ड्रायव्हर अन् आयशरच्या ड्रायव्हरची समोरासमोर बसून चौकशी..! काय येणार समोर?

विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबियांनीच हा घात-पात तर नाही ना अशी शंका उपस्थित करीत चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे नेमका अपघात झाला कसा? अपघातानंतर रुग्णसेवेला एवढा उशीर का झाला असे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

Vinayak Mete : सस्पेन्स..! मेटेंचा ड्रायव्हर अन् आयशरच्या ड्रायव्हरची समोरासमोर बसून चौकशी..! काय येणार समोर?
विनायक मेटेंच्या अपघात प्रकरणी आता त्यांचा ड्रायव्हर आणि आयशराच्या ड्रायव्हरची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 8:16 PM

मुंबई :  (Vinayak Mete) विनायक मेटे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी राजेगाव येथे अंत्यसंस्कार झाले आहेत. असे असले तरी नेमका (Accident) अपघात झाला कसा याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. यातच मेटेंचे कुटुंबीय आणि मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होत आहे. त्याच अनुशंगाने आता रायगड पोलीसांनी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. घटनेनंतर प्रथम विनायक मेटे यांचा ड्रायव्हर एकनाथ कदम याला (Driver’s inquiry) चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याची आरोग्य तपासणीही करण्यात आली होती. घटनेचा तपास सुरु असतानाच विनायक मेटे यांच्या गाडीला धडक दिलेला आयशरही सीसीटीव्हीमध्ये समोर आला आहे. हा आयशर रसायनी पोलीस स्थानकात पोलीस घेऊन गेले आहेत. आता चौकशीचे पुढचे पाऊल म्हणून मेटेंचा ड्रायव्हर अन् आयशरच्या ड्रायव्हरची समोरासमोर बसून चौकशी होऊ शकते. या चौकशीतून काय समोर येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दोन्ही ड्रायव्हर समोरासमोर

एका टोलनाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये विनायक मेटे यांच्या गाडीला ज्या आयशरने धडक दिली तो देखील समोर आला आहे. एवढेच नाही त्याचा चालक उमेश जाधव यालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन आयशर रसायनी पोलीस स्थानकात लावण्यात आला आहे. यानंतर आता विनायक मेटेंचा ड्रायव्हर एकनाथ कदम आणि आयशरचा ड्रायव्हर उमेश जाधव या दोघांची आता समोरासमोर चौकशी केली जाणार असल्याची शक्यता आहे. दोघांची चौकशी समोरासमोर झाली तर नेमके काय झाले होते हे समोर येणार आहे.

मेटेंच्या ड्रायव्हरवर उपचार सुरु

विनायक मेटे यांचा ड्रायव्हर एकनाथ कदम हा रसायनी पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, रविवारीच त्याला पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर चालकाने मद्यपान केले होते का, गाडी कशी धडकली, अपघात नेमका कशामुळे झाला, अशा विविध अंगांनी पोलीस तपास सुरु आहे. एकनाथ कदम यांच्यावरही कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या तीन वर्षापासून कदम हा मेटेंच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करीत आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातीलच असून अपघातानंतर त्यानेच ही घटना मेटेंच्या कुटुंबियांना सांगितली होती.

चौकशीच्या मागणीचा जोर वाढला

विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबियांनीच हा घात-पात तर नाही ना अशी शंका उपस्थित करीत चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे नेमका अपघात झाला कसा? अपघातानंतर रुग्णसेवेला एवढा उशीर का झाला असे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या बैठकीच्या वेळेत अचानक बदल कसा झाला. वेळेत बदल झाल्यानेट विनायक मेटे हे वेगाने मुंबईकडे निघाले आणि त्यामध्येच ही दुर्देवी घटना घडल्याचा आरोप केला जात आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.