VIDEO: चंद्रपुरात वाघांच्या फोटोसाठी छायाचित्रकार सैराट, फोटो काढायची हौस बेतू शकते जीवावर, नियम धाब्यावर
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या छायाचित्रणासाठी अनेक हौशे फोटोग्राफर्सकडून नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. वाघांचा आदिवास असलेल्या ठिकाणी त्यांचा माग काढत जाऊन अगदी पाच फुटावरून त्यांचे फोटो काढण्याचे धाडस केले जात आहे, मात्र हे धाडस कधी तरी जीवावर बेताण्याची शक्यता आहे. त
चंद्रपूर: चंद्रपुरात वाघाचे फोटो काढताना हौशी फोटोग्राफर्स सैराट झाल्याचे उघड झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur) प्रतिबंधित क्षेत्रात वाघाचे (Tiger) फोटो काढण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून पाच फुटावरून फोटो काढण्याची हौस पूर्ण केली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral)झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. वन्य जीव किंवा पर्यावरणाबाबत शासनाने कडक धोरण राबवूनही काही अतिउत्साही छायाचित्रकार नियम मोडत आहेत. सध्या प्राण्यांचा आदिवास माणसांमुळे धोक्यात आला आहे. पिकनिक आणि छायाचित्रण यामुळे अनेक जण आता जंगल सफर किंवा ट्रेकिंगच्या नावाखाली जंगलातील प्राण्यांच्या आदिवासाला धक्का पोहचवत आहेत. त्यामुळे असे प्रकार रोखण्याची गरज आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडलेले वाघ आता जिल्ह्याच्या सर्वच क्षेत्रात वावर करत आहेत. तरीही जिल्ह्यातील काही हौशी छायाचित्रकारांकडून वाघाच्या वाघाच्या व्हिडीओ आणि फोटोसाठी वन्यजीवविषयक मुलभूत नियमांची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे अशा हौशानवश्यांना वनविभागाने आवर घालण्याची गरज बनली आहे. वाघांचे फोटो काढण्यासाठी हौशी छायाचित्रकार आहेत वाघांचा माग काढत त्यांचा अदिवास शोधून काढण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे हे फोटो आणि व्हिडिओ काढण्याची हौश कधी तरी त्यांच्या जीवावरही बेतू शकते.
नियम डावलून वन विभागात प्रवेश
वन विभागाकडून अनेकदा नियम जाहिर करुनही याकडे नागरिक दुर्लक्ष करत जंगलात फिरत असतात. जंगलात वाहनांचा वापर वाढल्यामुळेही अनेक जंगली प्राणा बिथरण्याची शक्यता असते त्यामुळे वन्य प्राण्यांकडून माणसांवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने जंगलातील अनेक भागात नागरिकांना प्रवेश दिला जात नाही तरीही काही जण नियम धाब्यावर बसवून वन विभागात प्रवेश करत असतात.
हौस जीवावर बेतू शकते
चंद्रपुरात वाघाचे फोटो काढताना हौशी छायाचित्राकारांकडून नेहमीच सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. केवळ 5 फूटावरून फोटो काढण्याची हौस पूर्ण केली जात आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात वाघ रस्त्यावर सहजपणे वावरत आहेत. मात्र ग्रामस्थांना या वाघांचे वर्तन ठाऊक असल्याने ते आपला मार्ग विचार करुन निवडतात. मात्र सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वाघांचा माग काढत त्यांचे फोटो-व्हिडीओ घेण्याची हौस आता उघड झाली आहे. त्यामुळे वाघाचे फोटो काढतानाचे हौस जीवावर बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागानेही याबाबत सतर्क राहण्याची गरज असल्याची भावना पर्यावरणप्रेमीतून व्यक्त होत आहे.
संबंधित बातम्या
Nanded School| नांदेडमध्ये आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु, जिल्ह्यातल्या कॉलेजची स्थिती काय?
पठ्ठ्याला बॅनरबाजी भोवली, निवडणुकीसाठी बायको पाहिजे म्हणणाऱ्यावर औरंगाबादेत गुन्हा दाखल!