Video: अमरावतीत मुस्लिमांच्या मोर्चाला हिंसक वळण, भाजपाचं उद्या बंदचं आवाहन, काय घडतंय अमरावतीत?
विशेष म्हणजे हिंसक झालेला जमाव हा भाजप आणि आरएसएसविरोधी घोषणा देत होता. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपनं अमरावती बंदचं आवाहन केलंय.
भारतीय जनता पार्टीनं उद्या एक दिवशीय अमरावती बंदचं आवाहन केलं आहे. अमरावतीत आज मुस्लिमांनी एक मोर्चा काढला होता. त्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. जमावानं मोर्चाच्या गर्दीचा फायदा घेत काही दुकानांची तोडफोड केली. जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. दगडफेकही झाली. त्याच पार्श्वभूमीवर भाजपानं अमरावती बंदचं आवाहन केलं आहे. त्यामुळे उद्या अमरावतीत आता राजकीय धुमश्चक्री घडण्याची शक्यता आहे.
त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत.राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 12, 2021
भाजपचं नेमकं आवाहन काय? ‘शुक्रवार 12 नोव्हेंबर रोजी अमरावती शहरात संघटीत गुन्हेगारीने नंगा नाच घालून शहरात लूटमार, तोडफोड आणि दगडफेक केली. पोलिस यंत्रणा मूकदर्शक बनली होती. संपूर्ण अमरावती शहर प्रचंड दहशतीत होते. शहराला वाचवण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा अपयशी ठरल्या. परिणामी मुस्लिम समाजाने काढलेला मोर्चा लोकशाहीची पायमल्ली करणारा ठरला. आम्ही या मोर्चाचा निषेध करतो. भारतीय जनता पार्टी अमरावती जनतेच्या पाठीशी उभी आहे. कालच्या मोर्चाच्या संघटीत गुन्हेगारी निषेधार्थ उद्या शनिवार, 13 नोव्हेंबर रोजी भाजपाने अमरावती बंद चे आवाहन केले आहे. सर्व व्यापारी बंधूंनी दुपारी 4 वाजेपर्यन्त दुकाने बंद ठेवावी अशी विनंती भारतीय जनता पार्टी करत आहे’.
अमरावतीत नेमकं काय घडलं? ईशान्यतलं एक छोटं पण महत्वाचं राज्य आहे त्रिपुरा. तिथं गेल्या काही दिवसांपासून हिंदू मुस्लिम वादाची ठिणगी पडली आहे. जमावानं त्रिपुरात मशिद जाळल्याचं कथित वृत्त सगळीकडे पसरलं. त्याच्या निषेधार्थ आज राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मुस्लिमांनी मोर्चे काढले होते. असाच एक निषेध मोर्चा अमरावतीतही निघाला. मोर्चात काही हजार लोक सहभागी झाल्याचा दावा केला गेला. हाच जमाव नंतर हिंसक झाला. पोलीस ठिकठिकाणी होते. पण जमाव तुफान तोडफोड करत सुटला. दुकानांची लूट केली गेली. 20-22 दुकानं अक्षरश: फोडली. जमावानं पोलीसांवर दगडफेक केल्याचाही आरोप आहे. काही पोलीस जखमीही झाले. काही दुचाकीही जमावाच्या हाती लागल्या. त्याही फोडल्या गेल्या. विशेष म्हणजे हिंसक झालेला जमाव हा भाजप आणि आरएसएसविरोधी घोषणा देत होता. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपनं अमरावती बंदचं आवाहन केलंय.
VIDEO: माथी भडकवणाऱ्या एकाही समाजकंटकाला सोडू नका, कठोर कारवाई करा, शंभुराज देसाई यांचे आदेश
Nanded | त्रिपुरात मशिद पाडल्याचे पडसाद नांदेडमध्ये, पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक