जाळपोळ करणाऱ्या समाजकंटकांची संपत्ती जप्त करा, घरे नष्ट करा…विश्व हिंदू परिषदेची मागणी
ज्या लोकांनी अनेक घरे जाळली आहेत, त्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ४० ते ५० दुचाकी वाहने पेटवली आहेत. त्यामुळे हिंसाचार करणाऱ्या लोकांची संपत्ती जप्त करुन ज्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाई दिली जावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली.

नागपूर शहरात सोमवारी मोठा राडा झाला. संध्याकाळी नागपुरातील काही भागांत समाजकंटकांनी जाळपोळ केली. दगडफेक केली. पोलिसांवर हल्ला केला. अनेक वाहने जाळली. या प्रकरणावर भूमिका मांडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ज्या लोकांचा हिंसाचारात सहभाग होता, त्यांची संपत्ती जप्त करुन नुकसान झालेल्या लोकांची भरपाई करावी, अशी मागणी केली.
विश्व हिंदू परिषदेच्या प्रवक्ताने पत्रकार परिषदेत सांगितले की, औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे राज्यभरात सोमवारी आंदोलन झाले. त्याची कबर काढण्याची मागणी करणारे निवेदन सर्वत्र जिल्हाधिकारींना देण्यात आले. परंतु नागपूरमध्ये हिसांचार झाला. त्या प्रकाराचा निषेध आम्ही करत आहोत.
थेट संपत्ती जप्त करा…
औरंगजेबचा नाव महाराष्ट्रात नको आहे, ही भूमिका घेऊन विश्व हिंदू परिषदेने राज्यभर आंदोलन केले. परंतु औरंगजेबला मानणारे लोक आजही आहे, हे नागपुरात दिसल्याचे संघटनेने म्हटले. नागपुरातील हिंसाचार औरंगजेब यांना मानणाऱ्या लोकांनी घडवला. या विषयावर आम्ही लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्र्यांची भेट घेतली. आम्ही त्यांना सोमवारी नेमका काय प्रकार घडला ते लक्षात आणून दिले. ज्या जिहाद्दी लोकांनी तोडफोड केली आहे, तो प्रकार एक नियोजनबद्ध कट होता. यामुळे ज्या लोकांनी तोडफोड केली आहे, त्यांची संपत्ती जप्त करावी.
यासंदर्भात सरकारने कायदा केला आहे. त्या कायद्याचा वापर करुन समाजकंटकांची संपत्ती जप्त करावी. ज्या लोकांनी अनेक घरे जाळली आहेत, त्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ४० ते ५० दुचाकी वाहने पेटवली आहेत. त्यामुळे हिंसाचार करणाऱ्या लोकांची संपत्ती जप्त करुन ज्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाई दिली जावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली. अन्यथा विश्व हिंदू परिषद आगामी काळात पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.
अफवांवरुन हिंसाचार घडवला?
पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारींना निवेदन दिले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कारसेवा करण्याची होते. आता यापुढे ज्या पद्धतीने आंदोलन ठरेल, त्या पद्धतीने काम करु, असे संघटनेकडून यावेळी सांगण्यात आले. डेन्मार्क कार्टून बनल्यावर आग लावली जाते. प्रतिकात्मक कबरीवरील कपड्यावर काहीच लिहिले नव्हते. हा आरोप सर्व खोटे आहे. त्यांनी नियोजनबद्ध काम केले. त्या लोकांनी भगवा झेंडा जाळला. मंदिर उघडून त्या लोकांनी लाथा माऱ्याचे व्हिडिओ दिसत आहे, असा दावा विश्व हिंदू परिषदेने केला.