मुंबई विद्यापीठ ऑनलाईन परीक्षेचा गोंधळ, धक्कादायक माहिती समोर, नांगरे-पाटलांकडे तपास
मुंबई विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षांदरम्यान सायबर हल्ला झाला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे (Vishwas Nangare Patil investigating cyber attack case of Mumbai University Exam).
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षांमधील गोंधळ प्रकरणी आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेच्या दिवशी 9 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा होती. मात्र, ऐनवेली परीक्षेच्या दिवशी जवळपास अडीज ते 3 लाख लोकांनी हे अॅप ओपन केल्याचा प्रकार समोर येतोय. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी विद्यापीठाच्या तांत्रिक टीमसोबत बैठक घेतली. यानंतर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली (Vishwas Nangare Patil investigating cyber attack case of Mumbai University Exam).
उदय सामंत म्हणाले, “परीक्षेची पूर्ण सिस्टम हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. हा सायबर हल्ला असल्याने या संदर्भात कुलगुरुंनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. कुठल्याही परिस्थितीत मुलांचे शैक्षणिक नुकसान केलं जाणार नाही. या साऱ्या प्रकरणात चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल. मुंबईचे कायदा आणि सुववस्थेचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि कुरुगुरु यांची याच संदर्भात बैठक झाली.”
विद्यार्थी हित सर्वतोपरी मानत त्यांना परिक्षेदरम्यान अडचणी येऊ नयेत यासाठी मी सर्व विद्यापीठांना भेटी देऊन आढावा घेतला. आज तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणी परीक्षा होऊ शकल्या नाहीत. एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या,अशा सूचना मी संबंधित कुलगुरूंना केल्या आहेत.
— Uday Samant (@samant_uday) October 6, 2020
“9 हजार मुलांच्या परिक्षेचे नियोजन मुंबई विद्यापिठाने चांगल्या प्रकारे केलं होतं. विद्यापीठाने आणखी चांगली यंत्रणा उभी करुन परीक्षा घ्यावी, अशा सुचना कुलगुरुंना दिल्या आहेत,” अशी माहितीही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला होता. त्यामुळे ऐन परीक्षेत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने 6 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेच्या तारखा लवकरच ठरवून त्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि आयडॉलच्या लिंकवर प्रदर्शित केल्या जातील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी दिली होती.
दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या परीक्षेला 3 ऑक्टोबर 2020 पासून सुरुवात झाली होती. या परीक्षेच्या दुसऱ्या पेपरला हा सायबर हल्ला झाला. त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्याने हे पेपर पुढे ढकलण्यात आले होते. 7 ऑक्टोबर 2020 रोजी होणाऱ्या परीक्षा तृतीय वर्ष बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, तृतीय वर्ष बीएस्सी आयटी सत्र 6 आणि बॅकलॉगच्या परीक्षा प्रथम व द्वितीय वर्ष बीए व बीकॉम, एमसीए सत्र 1 व सत्र 2 या परीक्षाचे पेपरही पुढे ढकलण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, मुंबई विद्यापीठाने आयडॉलच्या परीक्षा पुढे ढकलल्या
Vishwas Nangare Patil investigating cyber attack case of Mumbai University Exam say Uday Samant