Ram Mandir | महाराष्ट्राच्या दाम्पत्याला सर्वात मोठा बहुमान, अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणावेळी मोदींसोबत पूजा करणार

अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा बहुमान देशातील 11 दाम्पत्यांना मिळाला आहे. त्यात नवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे.

Ram Mandir | महाराष्ट्राच्या दाम्पत्याला सर्वात मोठा बहुमान, अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणावेळी मोदींसोबत पूजा  करणार
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 10:07 PM

मुंबई | 18 जानेवारी 2024 : अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मंदिर उभं राहणं हा एक मोठा तप आहे. खूप वर्षांच्या मागणीनंतर रामभक्तांसाठी अभूतपूर्व असं मंदिर वास्तव्यात साकार होत आहे. या मंदिरावर असणारं रेखीव काम, त्याची भव्यदिव्यता, यांची आता इतिहासात नोंद होणार आहे. हे मंदिर आता वर्षानुवर्षे जिवंत राहणार आहे. या ऐतिहासिक भव्य मंदिराचा प्राण प्रतिष्ठापन सोहळा याची देही याची डोळा बघायला मिळणं हे खूप मोठं भाग्य आहे. या सोहळ्याच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये सुरू असलेली लगबग, जय्यत तयारी प्रत्यक्ष बघायला मिळणं, ती लगबग अनुभवनं यापेक्षा मोठं भाग्य असूच शकत नाही‌. श्रीराम जेव्हा लंका जिंकून आले तेव्हा अयोध्या जशी झगमगीत झाली होती तशी अयोध्या अनेक युगांनी बघायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अयोध्येच्या राम मंदिराच्या उभारणीला योगदान देणाऱ्या प्रत्येक हातांसाठी ते एक पुण्यकर्म आहे. इतक्या युगांनी ही भव्यदिव्यता अनुभवायला मिळणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचं येत्या 22 जानेवारीला लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या प्राण प्रतिष्ठाच्या सोहळ्यात मोदींसह 11 दाम्पत्य पूजा करणार आहेत. या पूजेचा बहुमान महाराष्ट्रातील एका दाम्पत्याला मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रामभक्तांकडून आनंद व्यक्त केला जातोय.

अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा बहुमान देशातील 11 दाम्पत्यांना मिळाला आहे. त्यात नवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे. अयोध्येत 22 जानेवारीला श्रीरामल्लांच्या प्राण प्रतिष्ठाच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रभू श्रीरामांची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे अशी या पती-पत्नीची नावे आहेत.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.