राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करा: राजू शेट्टी
एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. | Raju Shetty
बारामती: राज्यातील शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली. वीजबिल माफीशिवाय आम्ही माघार घेणार नाही. एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. (Raju Shetty warns Mahavikas Aghadi govt over electricity bill issue)
ते मंगळवारी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या वीजबिल वसुलीच्या निर्णयाला पुन्हा एकदा विरोध केला. यापूर्वीही राजू शेट्टी यांनी अनेकदा वाढीव वीज भरण्याला विरोध दर्शविला आहे. सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावीच, असे आव्हानही त्यांनी दिले होते.
5 फेब्रुवारी रोजी एमएसईबीवर ‘टाळे ठोको’ आंदोलन; भाजप देणार आघाडी सरकारला शॉक
शेतकरी आणि वीज ग्राहकांना वीज कापण्यासाठी राज्य सरकारने नोटीसा पाठवल्या आहेत. त्यावर भाजपने संताप व्यक्त केला आहे. या नोटीसा मागे घ्या अन्यथा येत्या 5 फेब्रुवारी रोजी राज्यात एमएसएईबीच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
ज्य सरकारने शेतकरी आणि ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी नोटीसा पाठवल्या आहेत. वीज बिल न भरल्यास वीज कापण्याचा इशाराही सरकारकडून देण्यात आला आहे. सरकारची ही अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही. या नोटीसा सरकारने मागे घ्याव्यात. नाही तर 5 फेब्रुवारी रोजी एमएसईबीच्या साडेसातशे मंडळांना टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचं घरगुती वीजबिल माफ करावं, अशी भूमिका घेऊन जून महिन्यापासून आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत. शहरी असो किंवा ग्रामीण असो, महाराष्ट्रीतील 1 कोटी 35 लाख कुटुंबांना लाभ मिळू शकतो. ही माफी घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही, ही आमची भूमिका आहे. या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत आमची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील काल आम्ही भेटलो. आम्ही सर्वांना निर्वाणीचा इशारा दिल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या:
सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावीच; राजू शेट्टींचे आव्हान
जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, वीजबिल वसुलीवर अजित पवारांचं उत्तर
ठाकरे सरकार पिंजऱ्यातून बाहेर पडत नाही, शिवसेना सर्व बटण दाबून करते, नारायण राणेंनी फटकारले
(Raju Shetty warns Mahavikas Aghadi govt over electricity bill issue)