Wardha Lockdown | वर्ध्यात खबरदारी म्हणून लॉकडाऊनमध्ये वाढ, आणखी 5 दिवस निर्बंध कायम

वर्धा जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील लॉकडाऊन पाच दिवसांसाठी वाढवला आहे. (wardha district lockdown corona pandemic)

Wardha Lockdown | वर्ध्यात खबरदारी म्हणून लॉकडाऊनमध्ये वाढ, आणखी 5 दिवस निर्बंध कायम
महाराष्ट्र लॉकडाऊन
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 7:46 PM

वर्धा : राज्य सध्या कोरोनाच्या ( Corona pandemic) दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. राज्यात रोज हजारो नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. सध्या रुग्णसंख्या काहीशी कमी होताना दिसत असली तरी अजूनही धोका टळलेला नाही. हीच गोष्ट लक्षात घेता वर्धा जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील लॉकडाऊन पाच दिवसांसाठी वाढवला आहे. याआधी लॉकडाऊनची मुदत ही 13 मे पर्यंत होती. मात्र, आता लॉकडाऊन 18 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. (Wardha district administration extended Lockdown for Five days amid Corona pandemic)

जिल्ह्यातील लॉकडाऊन वाढवला

कोरोना साखळी तोडण्यासाठी वर्धा जिल्ह्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये आणखी पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. नव्या निर्णयाअंतर्गत 18 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू असतील. यापूर्वी वर्धा जिल्हा प्रशासनाने 8 मे ते 13 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू केला होता. त्याची मुदत उद्या (13 मे रोजी) संपणार आहे. मात्र, मुदत संपली असली तरी, येथे अजूनही कोरोना रुग्णांची संख्या म्हणावी तेवढी कमी झालेली नाही. त्यामुळेच जर निर्बंधांमध्ये शिथिलता दिली तर पुन्हा एकदा रुग्णांचा भडका उडू शकतो. परिणामी येथील परिस्थिती गंभीर होऊ शकते. याच कारणामुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजीपाला थेट घरपोच देण्यासाठी नियोजन

सध्या लागू केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नागरिकांना भाजीपाला घरपोच देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची मदत घेण्यात येत असून भाजीपाला शेतकऱ्यांकडून घेऊन तो थेट ग्राहकांना घरपोच पोचवण्याचं नियोजन प्रशासन करत आहे.

नियम मोडल्यास कडक कारवाई होणार

दरम्यान, सध्या वर्धा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला असून प्रशासनाकडून त्याची चोखपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद असतील. तसेच या काळात विनाकारण घराबाहेर पडल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. बेकरी, मिठाई इत्यादी दुकानेसुद्धा या काळात बंद असतील.

इतर बातम्या :

ठाण्यात कोरोना बळींची संख्या का वाढली?; महापालिका आयुक्तांनी दिलं ‘हे’ कारण!

अरे देवा! अमरावतीत म्युकरमायकोसिसचा शिरकाव; प्रशासनात खळबळ

Maharashtra Coronavirus LIVE Update : दिलासादायक ! नागपुरात कोरोनाबधितांच्या तुलनेत बरं होणाऱ्यांची संख्या वाढली

(Wardha district administration extended Lockdown for Five days amid Corona pandemic)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.