मुथूट दरोडा प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 12 तासांत पाच आरोपींना अटक

या दरोड्यामध्ये बँकेतील ब्रँच मॅनेजरचाच हात असल्याचं समोर आलं आहे.

मुथूट दरोडा प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 12 तासांत पाच आरोपींना अटक
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 11:07 AM

वर्धा : वर्ध्यातील मुथूट फिनकॉर्प या फायनान्स कंपनीच्या ऑफिसवर दिवसाढवळ्या दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. कराण पोलिसांनी अवघ्या 12 ते 15 तासांत पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला आहे. या दरोड्यामध्ये बँकेतील ब्रँच मॅनेजरचाच हात असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. (wardha muthoot robbery police arrest manager and four others)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये एक ब्रँच मॅनेजर आणि इतर तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 पिस्टल, दोन चारचाकी वाहनं, काही सोनं या चार जणांकडून जप्त केल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. गुरुवारी, चोरट्यांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत सोने तारण कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपनी दरोडा टाकला होता. ही घटना सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास घडली. यानंतर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले होते आणि त्यांनी पुढे तपास सुरू केला.

रोख रक्कम, सोने आणि दुचाकी चोरीला

बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत दरोडेखोर मुथुट फिनकॉर्पच्या कार्यालयात पोहोचले. दरोडेखोरांनी कार्यालयातील 3 लाख 18 हजार रुपयांची रोख रक्कम आणि साडे तीन किलो सोने नेले लुटून नेले. त्यांनी मुथूट फिनकॉर्पच्या एका कर्मचाऱ्याची दुचाकीदेखील चोरुन नेली.

वर्धा शहरात खळबळ

गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास दरोड्याची घटना घडल्याने वर्धा शहरात खळबळ माजली होती. लाखो रुपयांचा दरोडा घालून दरोडेखोर पसार झाले. पण हे काम बँकेच्या ब्रँच मॅनेजरनेच केलं असल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे. मुथूट फिनकॉर्पच्या व्यवस्थापनाला गुंगारा देत दरोडेखोरांनी सोने, रोख रक्कम लुटून नेली. मुथुट फिनकॉर्पच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या चेंबर पेटीतून रक्कम लंपास करण्यात आली. (wardha muthoot robbery police arrest manager and four others)

इतर बातम्या –

वर्ध्यात बँकेवर दिवसाढवळ्या दरोड्याचा थरार, साडे तीन किलो सोनं लुटलं ! काय काय घडलं ?, पाहा व्हिडीओ

Wardha | वर्ध्यात बंदूक, चाकू दाखवत मुथुट फायनान्सवर दिवसाढवळ्या दरोडा

(wardha muthoot robbery police arrest manager and four others)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.