अंकिता पिसुड्डे जळीतकांड : द्वितीय पुण्यस्मरण करून आई-वडील न्यायालयात, आज न्यायाची अपेक्षा

ज्या दिवशी ती मरण पावली तो दिवस म्हणजे दहा फेब्रुवारी 2020 आज या घटनेला दोन वर्षे पूर्ण झालीत. सात दिवसांच्या झुंजीनंतर अंकिताने आपले प्राण सोडले होते. तिचे दुसरी पुण्यस्मरण करून तिचे आई-वडील आज न्यायालयात गेले.

अंकिता पिसुड्डे जळीतकांड : द्वितीय पुण्यस्मरण करून आई-वडील न्यायालयात, आज न्यायाची अपेक्षा
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 11:13 AM

वर्धा : बहुचर्चित प्राध्यापिका अंकिता पिसूड्डे जळीतकांड (Ankita Pisudde) प्रकरणात आज शिक्षा सुनावली जाणार आहे. आज अंकिता यांच्या मृत्यूला दोन वर्षे पूर्ण झालीत. अंकिता यांचे द्वितीय पुण्यस्मरण (Punyasmaran) करून तिचे आई-वडील आज न्यायालयात आलेत. अंकिताला न्याय मिळेल. न्यायालय आम्हाला न्याय देईल, असं तिच्या आईवडिलांना वाटतंय. ज्या दिवशी ती मरण पावली तो दिवस म्हणजे दहा फेब्रुवारी 2020. आज या घटनेला दोन वर्षे पूर्ण झालीत. सात दिवसांच्या झुंजीनंतर अंकिताने आपले प्राण सोडले होते. तिचे दुसरी पुण्यस्मरण करून तिचे आई-वडील आज न्यायालयात (Court) गेले. आज तिला न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हिंगणघाट तालुक्यातील अंकिता पिसुड्डे हिला दोन वर्षांपूर्वी जाळून मारण्यात आले. या जळीत प्रकरणात न्यायाधीसांनी आरोपी विकेश नगराळे याला दोषी ठरवलं. अंकिता हिचा तीन फेब्रुवारी 2020 रोजी खून करण्यात आला. घटनेच्या दिवशी सकाळी प्राध्यापिका कॉलेजला जात होती. आरोपी विकेशने तिचा पाठलाग केला. तू माझ्याशी लग्न का केलं नाही, अशी विचारणा केली. विकेशनं तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळले.

आजच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष

सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम काम पाहत आहेत. दोषी सिद्ध झाल्यानं आता आरोपीला त्याचं म्हणणं कोर्टासमोर सादर करावं लागेल. विकेशचं कौर्य पाहता त्याला कोणती शिक्षा असावी. यासंदर्भातील तक्ता सरकारी पक्षातर्फे न्यायालयात सादर केला जाईल. त्यानंतर कोर्ट निकाल देईल. कालच्या निकालावर अंकिता यांच्या आई – वडिलांनी समाधान व्यक्त केलंय. जास्तीत जास्त शिक्षा सुनावली जाईल. अशी अपेक्षा अंकिताची आई संगीता व व वडील अरुण यांनी व्यक्त केलीय. दोन वर्षांनंतर का होईना अंकिताला न्याय मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

काय आहे प्रकरण?

अंकिता हिंगणघाटच्या महाविद्यालयात प्राध्यापिका होती. अंकिता आणि आरोपी हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावाचे रहिवासी. अंकिता 3 फेब्रुवारी 2020 रोजी गावाहून बसने हिंगणघाटला गेली. नंदोरी चौकातून ती कॉलेजच्या दिशेने जात होती. विकेश नगराळेने पेट्रोल ओतून तिला पेटवले. अंकिताला नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेतला. आरोपीचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. तू माझ्याशी लग्न का केलं नाही, म्हणून त्याने सूड उगविला.

Video- Hinganghat | अंकिताचा मारेकरी कोर्टात दोषी, उद्या न्यायालय सुनावणार शिक्षा; उज्ज्वल निकम यांनी आणखी काय सांगितलं?

अंकिता जळीतकांड प्रकरण : आरोपीला दोषी ठरविल्याने आई-वडील समाधानी, तर बचाव पक्षाची तयारी काय?

Nagpur Crime | गुंडांच्या दोन गटात मारहाण, नागपुरात रात्री अपहरणाचा थरार; पुढे आरोपी आणि मागे पोलिसांचा ताफा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.