Video- Hinganghat | अंकिताचा मारेकरी कोर्टात दोषी, उद्या न्यायालय सुनावणार शिक्षा; उज्ज्वल निकम यांनी आणखी काय सांगितलं?
हिंगणघाटातील अंकिता जळीतकांडात आज न्यायालयाने आरोपी निकेश नगराळेला दोषी ठरवलं. उद्या, गुरुवारी न्यायालय आरोपीला शिक्षा सुनावणार आहे. सरकारी पक्षाचे वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिली. आणखी काय म्हणाले, निकम....
वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील अंकिता पिसुंडे (Ankita Pisunde) हिला दोन वर्षांपूर्वी जाळून मारण्यात आले. या जळीत प्रकरणात न्यायाधीसांनी आरोपी निकेश नगराळे (Nikesh Nagarale) याला दोषी ठरवलं. अंकिता पिसुरडे हिचा तीन फेब्रुवारी 2020 रोजी खून करण्यात आला. घटनेच्या दिवशी सकाळी प्राध्यापिका कॉलेजला जात असताना आरोपी निकेशने तिचा पाठलाग केला. तू माझ्याशी लग्न का केलं नाही, अशी विचारणा केली. ही मारण्यापूर्वी निकेशने दिलेली धमकी होती. निकेशनं तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळले. हा खुनाचा आरोपी सरकारी पक्षानं न्यायालयात सिद्ध केला. असं हिंगणघाट येथील सत्र न्यायाधीश (Sessions Judge at Hinganghat) भागवत यांनी न्यायालयात आज जाहीर केलं. निकेश विरोधात आरोप सिद्ध झाला आहे, असे न्यायालयाने आज घोषित केल्याची माहिती सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली.
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकूण मिळणार निकाल
निकम यांनी त्यानंतर सरकारतर्फे न्यायालयाला विनंती केली की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आरोपीला आरोप सिद्ध झाल्यानंतर शिक्षा दुसऱ्या दिवशी जाहीर करावी. एखाद्या आरोपीला खुनाच्या आरोपात दोषी ठरविण्यात येतं तेव्हा शिक्षेबद्दल युक्तिवाद काय आहे. त्यासाठी एक दिवसाची मुदत दिली जाते. आरोपीला त्याचं म्हणणं कोर्टासमोर सादर करावं लागते. निकेशचं कौर्य पाहता त्याला कोणती शिक्षा असावी. यासंदर्भातील तक्ता सरकारी पक्षातर्फे आम्ही न्यायालयात देऊ, असंही निकम यांनी सांगितलं. तसेच आरोपीतर्फे त्याला कुठली शिक्षा असावी. यासाठी आरोपीतर्फे युक्तिवाद केला जाईल. त्या दृष्टिकोणातून न्यायालय उद्या शिक्षा जाहीर करेल, असंही निकम यांनी सांगितलं.
हिंगणघाटात चोख पोलीस बंदोबस्त
वर्धा जिल्ह्यातील प्राध्यापिका अंकिता पिसुंडे जळीतकांड प्रकरणाच्या पार्श्वभुमीवर हिंगणघाटच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त होता. निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं. त्यामुळे लोकांची गर्दी जमली होती. या पार्श्वभूमीवर हिंगणघाट परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हिंगणघाट येथील बहुचर्चित अंकिता जळीतकांड प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झालेत. प्रा. अंकिता जळीतकांड प्रकरणात सरकारी आणि आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे 29 साक्षीदार तपासण्यात आलेत.