Wardha Crime | वायफडच्या सरपंचाला मारहाण; दगडाने फोडले डोके, वादाचे कारण काय?

वर्धा जिल्ह्यातील वायफड येथील सरपंचाला मारहाण करण्यात आली. सरपंचाचे दगडाने डोकं फोडण्यात आलं. पुलगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Wardha Crime | वायफडच्या सरपंचाला मारहाण; दगडाने फोडले डोके, वादाचे कारण काय?
वर्धा जिल्ह्यातील विजय राऊत या सरपंचाला मारहाण करण्यात आली. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 4:11 PM

वर्धा : गावात सुरू असलेल्या विकास कामांच्या जागेवरील वाळू उचलून नेत असताना सरपंचानं संबंधितांना हटकलं. यावरून सरपंचाला शिवीगाळ (Sarpanch was insulted) करीत दगडाने डोक्यावर मारहाण करण्यात आली. यात सरपंचाचं डोकं फोडून जखमी झाली. ही घटना वायफड येथे घडलीय. वायफड येथील विजय रामदास राऊत (Vijay Ramdas Raut) (वय 27) असं जखमी सरपंचाचं नाव आहे. गावात रस्त्याच्या बांधकामासाठी वाळू आणून ती रस्त्याच्या कडेला कंत्राटदारानं ठेवली होती. आरोपी अरुण बावणे हा रस्त्याच्या कडेला ठेवलेली वाळू चोरून नेत होता. सरपंच विजय राऊत यांना अरुण बावणे हा वाळू नेत असल्याचे दिसले. त्यामुळं राऊत यांनी बावणे यास हटकले. यावेळी बावणे याने शिवीगाळ करून प्लास्टिक टोपल्याने तसेच दगडाने (with a plastic basket and stones) राऊत यांच्या डोक्यावर मारहाण केली.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

यात सरपंच राऊत जखमी झाले. घटनेची तक्रार सरपंचाने पुलगाव पोलिसांत दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पुलगाव पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला ताब्यात घेतले आहे. सोबतच आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा पुलगाव पोलिसांनी केली असल्याची माहिती आहे. वर्धा जिल्ह्यातील वायफड येथील सरपंचाला मारहाण करण्यात आली. सरपंचाचे दगडाने डोकं फोडण्यात आलं. पुलगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

समाजकंटकांमुळं गावाचं नुकसान

या घटनेत सरंपच आपले कर्तव्य बजावत होते. पण, गावात काही समाजकंटक असतात. ते सरकारची संपत्ती म्हणजे सार्वजनिक समजतात. यातून अशा घटना घडतात. गावात सरपंचाला मान दिला जातो. गावाचा विकास हा सरपंचावर अवलंबून असतो. मात्र, अशा समाटकंटकामुळं गावाचं नुकसान होतं. त्यामुळं गावात पुढारीपण करणं काही जण टाळतात. यात सरपंचाचं काही नुकसान झालं नसतं. मात्र, गावाचा पुढारी म्हणून संबंधिताला टोकणं आवश्यक होतं. अन्यथा सार्वजनिक वस्तूंचा बट्टाबोळ झाल्याशिवाय राहणार नाही.

Yavatmal NCP | जिल्हाध्यक्ष हटाव, राष्ट्रवादी बचाव; यवतमाळ जिल्ह्यात असंतुष्टांची बॅनरबाजी, बैठक वादळी ठरणार?

Meteor Shower or Satellite ? : वर्धेतही सापडले सिलिंडरच्या आकाराचे अवशेष, पोकळ असलेली वस्तू प्लास्टिकसारखी

Meteor Shower or Satellite ? चंद्रपुरातील पवनपारमध्ये सापडला साडेपाच किलोचा गोळा; प्रशासन करणार तपास

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.