Wardha Sena Rada : विदर्भात शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या नमनालाच पक्षांतर्गत राडा, वर्ध्यात दोन नेत्यांची बाचाबाची कॅमेऱ्यात

विदर्भात शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या नमनालाच पक्षांतर्गत राडा झाला. वर्ध्यात दोन नेत्यांची बाचाबाची कॅमेऱ्यात कैद झाली. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे यांनी तोडफोड केल्याची माहिती आहे. विधानसभा संपर्क प्रमुख गणेश टोणे आणि जिल्हाप्रमुख यांच्यासोबत बाचाबाची झाली.

Wardha Sena Rada : विदर्भात शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या नमनालाच पक्षांतर्गत राडा, वर्ध्यात दोन नेत्यांची बाचाबाची कॅमेऱ्यात
वर्धा येथे शिवसेनेच्या नेत्यांचा राडा झाला. यात शिविगाळ तसेच तोडफोड करण्यात आली.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 5:46 PM

वर्धा : जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानापूर्वी (Shiv Sampark Abhiyan) शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर आलाय. वर्धेच्या स्थानिक विश्राम गृहात शिवसेना संपर्क प्रमुख आणि जिल्हाप्रमुख बसले असता तोडफोड झाली. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे यांनी तोडफोड केल्याची माहिती आहे. विधानसभा संपर्क प्रमुख गणेश टोणे आणि जिल्हाप्रमुख यांच्यासोबत बाचाबाची झाली. मुंबई येथील शिवसंपर्क अभियानासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांवरही हल्ला करण्यात आलाय. विश्रामगृहाच्या (Rest house) कावेरी या खोलीत जाऊन टेबलाची तोडफोड करण्यात आली. आजपासून शिवसंपर्क अभियान सुरू झाले. खासदार कृपाल तुमाने (MP Kripal Tumane) यांच्याकडे वर्धा जिल्ह्याच्या संपर्काची जबाबदारी देण्यात आली आहे. तुमाने दौऱ्यावर येण्यापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी आले असता हा वाद झाला. मागील काही दिवसापासून जिल्ह्याच्या शिवसेनेत वाद सुरु आहे.

पाहा व्हिडीओ, वर्धा येथे शिवसेनेचा राडा

जीवे मारण्याची धमकी

आज विश्रामगृहात झालेल्या राड्यावरून जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आणि माजी खासदार अनंत गुढे यांनी शहर पोलीस ठाण्यात तुषार देवढे विरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेच्या वतीने 22 ते 25 मार्च या कालावधीत शिवसेना संपर्क मोहीम हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी मंगळवारी येथील विश्रामगृहात मुंबई येथून शिवसेना संपर्क प्रमुख आणि काही पदाधिकारी दाखल झाले होते. मात्र, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे हे आपल्या कार्यकर्त्यांसह विश्रामगृहात दाखल झाले. त्यांनी विधानसभा संपर्क प्रमुख गणेश टोणे आणि जिल्हाप्रमुखांशी बाचाबाची करुन शाब्दिक वाद करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

शासकीय मालमत्तेचे नुकसान

तसेच त्यांनी व त्यांच्यासोबत आलेल्यांनी विश्रामगृहातील साहित्याची तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी तक्रार माजी खासदार अनंत गुढे यांनी शहर पोलिसात दिली. अशी माहिती वर्धा येथील पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी दिली. शिवसेनेतील कलह तोडफोड, बाचाबाचीत रूपांतरित झाला. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झालीय. सत्तेत असलेल्या पक्षातील माजी पदाधिकाऱ्याचा राडा राजकीय वर्तुळात चर्चित होता. या राड्याने अभियान सुरू होण्यापूर्वीच त्यास गालबोट लागल्याची परिस्थिती निर्माण झाली.

Chandrapur | चितळ शिकार प्रकरण; फरार आरोपीला अडीच वर्षानंतर ठोकल्या बेड्या

Bhavana Gawli या वैयक्तिक कारणाने पक्षाच्या अभियानातून बाजूला, अरविंद सावंत यांची माहिती

VIDEO: अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला ही चूक होती, राऊतांची पहिल्यांदाच कबुली

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.