Dadarao Keche : जे नुकसान झालं ते दाखवा नाहीतर उभा गाडीन अन् जोड्यानं मारीन, वर्ध्याच्या भाजपा आमदाराची कनिष्ठ अभियंत्याला तंबी

कारंजा तालुक्यातील पारडी शिवारात भाजपा आमदार दादाराव केचे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी ते संतापले. काही शेतकऱ्यांनी सिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंता हे शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरीच्या नुकसानीबाबत अहवाल बनविताना भेदभाव करत असल्याचा आरोप केला.

Dadarao Keche : जे नुकसान झालं ते दाखवा नाहीतर उभा गाडीन अन् जोड्यानं मारीन, वर्ध्याच्या भाजपा आमदाराची कनिष्ठ अभियंत्याला तंबी
नुकसानग्रस्त पीकांच्या पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांवर संतापले दादाराव केचेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 7:54 PM

वर्धा : जे नुकसान झाले ते दाखवा अन्यथा उभा गाडीन आणि स्वतः जोड्याने मारीन, अशी तंबी भाजपा आमदार दादाराव केचे (Dadarao Keche) यांनी सिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंत्यांला दिली आहे. कारंजा तालुक्यात पावसामुळे झालेल्या पीकांच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी सिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंत्यांना त्यांनी लक्ष्य केले. जिल्ह्यात सगळीकडे पावसाने (Wardha rain) हाहाकार उडवला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरीदेखील हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लोकप्रतिनिधी पाहणी करत आहे. अशातच आर्वी विधानसभा मतदार संघांचे भाजपा आमदार दादाराव केचे यांनीदेखील कारंजा तालुक्यात पाहणी दौरा केला. दरम्यान, शेतकऱ्यांवर (Farmers) अन्याय होता काम नये. जे नुकसान झाले ते दाखवा अन्यथा उभा गाडीन आणि स्वतः जोड्याने मारीन, अशी तंबी अधिकाऱ्यांना दिली.

बांधावर जाऊन केली पाहणी

कारंजा तालुक्यातील पारडी शिवारात भाजपा आमदार दादाराव केचे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी ते संतापले. काही शेतकऱ्यांनी सिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंता हे शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरीच्या नुकसानीबाबत अहवाल बनविताना भेदभाव करत असल्याचा आरोप केला. यावर आमदार दादाराव केचे संतप्त झाले. आमदार केचे यांनी कनिष्ठ अभियंत्याला बोलवत तुम्ही शेतकऱ्यांच्या विहिरी गायब केल्या, तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय करता. आताही करणार काय अन्याय, असे विचारत उभा गाडीन आणी कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय झाला तर स्वतः जोड्याने मारीन हे लक्षात ठेवा, अशी तंबीच दिली त्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

‘विहिरीच्या नुकसानीचा अहवाल बनविताना पैसे घेता’

तुम्ही शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरीच्या नुकसानीचा अहवाल बनविताना वीस हजार द्या, दहा हजार द्या, असे म्हणता. ज्यांचे पैसे पोहोचले त्यांच्या विहिरी बरोबर दाखविल्या जातात. यामुळे आता असे चालणार नाही. शेतकऱ्यांवर अन्याय नको, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोकप्रतिनिधींकडूनही पाहणी दौरे करून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. मात्र संकटात सापडलेल्या नागरिकांना आता तातडीने मदत मिळावी, हीच अपेक्षा व्यक्त होत आहे.

वर्ध्याची दोन दिवसांपूर्वीची स्थिती, पाहा व्हिडिओ –

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.