Wardha Illness : वर्धा जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीसचे 9 रुग्ण पॉझिटिव्ह, जनावरांना होणारा आजार माणसांनाही

छोट्या किटकांकडून पायावर दंश झाल्याने हा आजार होतो. लहान मुलांना जनावरांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. तीव्र ताप येणे, अंगदुखी, स्नायूदुखी, डोकेदुखी, डोळे लालसर होणे, सर्दी, खोकला आदी लक्षणे दिसून येतात. याकडं की दुर्लक्ष करू नये, असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी राज पराडकर यांनी केलं आहे

Wardha Illness : वर्धा जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीसचे 9 रुग्ण पॉझिटिव्ह, जनावरांना होणारा आजार माणसांनाही
वर्धा जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीसचे 9 रुग्ण पॉझिटिव्हImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 11:09 PM

वर्धा : एरवी जनावरांना होणाऱ्या लेप्टोस्पायरोसीस (Leptospirosis) या आजाराचे रुग्ण मनुष्यातदेखील आढळले आहेत. वर्धा जिल्ह्यात तब्बल नऊ जणांचे अहवाल लेप्टोस्पायरोसिस पॉझिटिव्ह (Positive) आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळं आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. वर्धा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अनेक जनावरांना लेप्टोस्पायरोसीस व थायलेरिओसीस (Theileriosis) या रोगाची लागण झाली होती. पशू संवर्धन विभागाच्या चमूनं जनावरांची तपासणी केली. तेव्हा ही बाब पुढ आली होती. यावर युद्धपातळीवर उपाययोजना करत नियंत्रणही मिळवलं. मग या अनुषंगानं आरोग्य विभागानं तीन तालुक्यात तापसदृश्य रुग्णांचे रक्त नमुने तपासणीला पाठवले. त्यातील नऊ जणांना लेप्टोस्पायरोसीस आजारानं ग्रासल्याची माहिती पुढे आली. सेवाग्रामच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर 9 रुग्णांना लेप्टोस्पायरोसीस आजारानं ग्रासल्याची माहिती पुढे आली. रुग्णांची प्रकृती चांगली आहे.

अशी असतात रोगाची लक्षणं

छोट्या किटकांकडून पायावर दंश झाल्याने हा आजार होतो. लहान मुलांना जनावरांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. तीव्र ताप येणे, अंगदुखी, स्नायूदुखी, डोकेदुखी, डोळे लालसर होणे, सर्दी, खोकला आदी लक्षणे दिसून येतात. याकडं की दुर्लक्ष करू नये, असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी राज पराडकर यांनी केलं आहे.

असा पसरतो आजार

लेप्टोस्पायरोसीस हा गाय, बैल, वासरू, म्हैस, रेडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, श्वान, मांजर यास प्रामुख्यानं लागण होते. कुरतडणारे प्राणी उंदीर, घुस अशा वाहकांमुळं, दूषित पाणी, दूषित मूत्र, दूषित मातीद्वारा याचा प्रसार होतो. आजार टाळण्यासाठी जनावरांसोबतच स्वतःची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. माणसापासून पशुंना किंवा पशूंपासून माणसांना होणाऱ्या आजारांची संख्या बरीच आहे. त्यामुळं दोघांनीही एकमेकांपासून काळजी घेतली पाहिजे.

हे सुद्धा वाचा

वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.