Wardha Police | वर्धेत कर्तव्यासह निभविला पतीव्रता धर्म, खाकीतल्या महिला पोलिसांचे वटवृक्ष पूजन; रेल्वे स्वस्त, पोलिसांची नोकरी मस्त!
शहर आणि रामनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी यांनी ठाण्याच्या आवारातील वटवृक्षाचे पूजन केले. कर्तव्याला प्राधान्य देऊन आम्ही आज रुढीपरंपरेनुसार भारतीय नारी म्हणून वटवृक्षाचे पूजन केले आहे. खाकी वर्दीत वटपौर्णिमा साजरी करताना आम्हाला एकप्रकारे गर्वच वाटत आहे, असे महिला पोलीस कर्मचारी यांनी सांगितले.
वर्धा : वटपोर्णिमा…(Vatpornima) सती सवित्रीच्या पती प्रेमाची प्रशंसा करणारे पूजन. लग्नात बांधलेली लगीनगाठ आणखी घट्ट करण्यासाठी भगिनींनी वडाच्या झाडाला (Vadache Zad) फेऱ्या मारत धाग्यांनी आणखी रेशीमबंध घट्ट करण्याचाच दिवस. झाडाचे पूजन म्हणजेच पर्यावरणाचे देखील पूजन… पण कोरोनाच्या काळात कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांसमोर कर्तव्य आणि कुटुंबप्रेम असे दोन्ही कर्तव्य पार पडण्याचाच प्रश्न उभा ठाकला. अखेर पोलीस ठाण्यातच आवारात उभ्या असलेल्या डौलदार वटवृक्षाला फेऱ्या मारून खाकीतल्या सवित्रीणी आपल्या कौटुंबीक कर्तव्याची जबाबदारी देखील पार पाडलीय. वटपौर्णिमेचे औचित्य साधून आपल्या कर्तव्यासह पतीव्रता धर्माचे पालन वर्धा शहर पोलीस ठाण्यातील आणि रामनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी निभावले. वर्धा शहर ठाण्यातील वडाच्या झाडाचे पूजन (Vat Vriksha Pujan) करून केले.
कोरोनाचे संकट जाऊ दे
याप्रसंगी महिला पोलिसांनी खाकी वर्दी परिधान करून कोरोनाचे संकट जाऊ दे. तसेच माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे, असे साकडेच वटवृक्षाला घातले. पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी सतत सेवा देत आहेत. सतत चोवीस तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वटपौर्णिमेचे औचित्य साधून पतीव्रता धर्माचे पालन करणे थोडे कठीण होते. पण त्यावरही मात करून पहिले कर्तव्य आणि त्याच बरोबर रुढीपरंपरेनुसार पतीव्रता धर्माचे पालन आज महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केले. अशी माहिती महिला पोलीस कर्मचारी सुनीता ठाकरे यांनी दिली.
खाकी वर्दीत वट वृक्षाचे पूजन
शहर आणि रामनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी यांनी ठाण्याच्या आवारातील वटवृक्षाचे पूजन केले. कर्तव्याला प्राधान्य देऊन आम्ही आज रुढीपरंपरेनुसार भारतीय नारी म्हणून वटवृक्षाचे पूजन केले आहे. खाकी वर्दीत वटपौर्णिमा साजरी करताना आम्हाला एकप्रकारे गर्वच वाटत आहे, असे महिला पोलीस कर्मचारी यांनी सांगितले.
ऑक्सिजन पार्कमध्ये आगळेवेगळे पूजन
वर्धेतील ऑक्सिजन पार्कमध्येही महिलांसोबत पुरुषांनी वटपोर्णिमा साजरी केली. वडाचे वृक्षाचे पूजन करून वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. महिलांच्या पायाला काटा रुतू नये यासाठी पुरुषांनी झाडासभोवती स्वच्छता केली. महिलांकडून ग्रामगीतेच्या विसाव्या महिलोन्नतीचा अध्याय वाचन करण्यात आला. पृथ्वीवरील झाडाचे तापमान कमी करण्याचं काम हे वडाचं झाड करत असते, असा संदेश प्रसिद्ध खंजीरीवादक भाऊसाहेब थुटे यांनी दिला. देश हिरवागार करून पृथ्वीचं तापमान कमी करावं, असंही त्यांनी सांगितलं.