Wardha Crime | वर्धा कारागृहात पतीला भेटायला आली, तिथं वाद होताच तोडफोड केली, पोलिसांत गुन्हा दाखल
वर्धा येथे बंदिवानाच्या पत्नीने कारागृहात तोडफोड केली. मुलाखत रुमचा काच तोडण्याचा प्रयत्न केला. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातं. वर्धा शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वर्धा : महिला पती कारागृहात शिक्षा भोगत आहे. ती त्याला भेटायला वर्धा येथील कारागृहात (In Wardha jail) गेली. पण, तिथं दोघांचा काहीतरी वाद झाला. यात वादातून महिला प्रचंड संतापली. कारागृहात पतीला भेटण्यासाठी गेलेल्या पत्नीने मुलाखत रुममध्ये तोडफोड केली. शासकीय मालमत्तेचे नुकसान (damage to government property) केले. ही घटना जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे घडली. या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बंदिवानाच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. कारागृहात पतीसोबत बोलत असताना घरगुती वादातून हा प्रकार झाल्याचं सांगितलं जातंय. महिलेविरोधातही गुन्हा दाखल (case filed against woman) करण्यात आला.
कारागृहातील इंटरकॉम सिस्टमची तोडफोड
न्यायबंदी धिरज गौतम याला कलम 4, 25 मध्ये 8 मे रोजी न्यायालयाच्या आदेशान्वये कारागृहात पाठविले आहे. बंदिवानाची पत्नी निलम ही पतीला भेटण्यासाठी कारागृहात दाखल झाली. ती मुलाखत घेत असताना घरगुती वादातून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अशातच तिने कारागृहातील इंटरकॉम सिस्टमची तोडफोड केली. तसेच मुलाखत रुममधील काच फोडण्याचा प्रयत्न केला. यावरून कारागृहात शासकीय मालमत्तेचे नुकसान करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार कार्यालयाचे प्रतिनिधी आशुतोष देविदास बोंडे यांच्यामार्फत शहर पोलीस ठाण्यात देण्यात आलीय. तक्रारीवरून निलम गौतमविरुद्ध वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारागृहात महिलेचा आकांडतांडव
वर्धा येथे बंदिवानाच्या पत्नीने कारागृहात तोडफोड केली. मुलाखत रुमचा काच तोडण्याचा प्रयत्न केला. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातं. वर्धा शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कारागृहात कुणालाही विनाकारण जाता येत नाही. एखाद्या बंदीवानाला भेटायचं असेल, तर त्यासाठी परवागनी घ्यावी लागते. कडक सुरक्षा व्यवस्था तिथं असते. अशावेळी या महिलेनं आकांडतांडव केला. त्यामुळं तिच्या विरोधात पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला. पतीनं गुन्हा केला म्हणून तो कैदेत आहे. आता पत्नीच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला.