AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Crime | कैदेतून सुटीवर आले नि पसार झाले, 14 वर्षांनंतर फरार दोन गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

नागपूरच्या कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगताना दोन गुन्हेगार संचित रजेवर बाहेर आले. पण, ते बंदिवान कारागृहात परत गेलेच नाहीत. तब्बल 14 वर्षांनंतर या फरार बंदिवानांना वर्धा पोलिसांनी (Wardha Police) ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथून ताब्यात घेतले. ही कारवाई वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेने केली.

Wardha Crime | कैदेतून सुटीवर आले नि पसार झाले, 14 वर्षांनंतर फरार दोन गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात
वर्धा पोलिसांनी कैदेतून फरार असलेल्या दोन आरोपींना अटक केली. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 10:19 AM

वर्धा : एका खून प्रकरणात दोन आरोपींना जन्मपेठेची शिक्षा (Two convicts were sentenced to life imprisonment) झाली. ती शिक्षा भोगत असताना हे सुटीवर गेले. दोघांनीही संगनमत करून खून केला होता. तसेच दोघांनीही संघनमत करून जेलमध्ये परत न जाण्याचा निर्णय घेतला. गेली चौदा वर्षे त्यांनी बाहेर काढले. पण, शेवटी पोलिसांच्या तावडीत सापडलेच. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. आता पुन्हा त्यांना जेलमध्ये खडी फोडावी लागणार आहे. वर्धा येथील साईनगरचे (at Sainagar, Wardha) सुनील उर्फ सनी रमेशचंद्र झाडे (वय 37) व राहुल रमेशचंद्र झाडे (वय 39) हे दोन आरोपी आहेत. एका खून प्रकरणात हे दोघेही नागपूर कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होते. 2008 मध्ये ते संचीत रजेवर आले. संचित रजा भोगून दोघांनीही कारागृहात हजर व्हायला पाहिजे होते. परंतु, तो रजेचा कालावधी संपूनसुध्दा मध्यवर्ती कारागृह नागपूर (Nagpur Central Jail) येथे परत गेले नाही.

पुन्हा जेलमध्येच काढावे लागतील दिवस

तेव्हापासून फरार असल्याने त्यांच्याविरूध्द वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या आरोपींस पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयातून वर्धा जिल्हा फरार बंदी अभिलेखावर समाविष्ट करण्यात आले. पोलिसांनी आरोपींचा सातत्याने व कसोशीने शोध घेतला. त्यांचा पाठपुरवठा करून त्यांच्याबाबत अधिकाअधिक माहिती मिळविली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे फरार बंदी सुनील झाडे आणि फरार बंदी राहुल झाडे या दोघांना ठाणे जिल्ह्यातील पोद्दार सोसायटी बदलापूर येथून ताब्यात घेण्यात आले. पुढील कायदेशीर कार्यवाहीकरिता वर्धा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आता पुन्हा त्यांना कैदेतच दिवस काढावे लागणार आहेत. एखाद्याचा खून करून जीवन संपविणे त्यांना सोपे वाटले असेल. आता शिक्षा भोगताना त्यांना त्यांचे जुने दिवस आठवल्याशिवाय राहणार नाही.

Video Bhandara | डॉक्टर की हैवान! चपराशाला अमानुष मारहाण, गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार

Chandrapur | गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी रात्रीच्या गस्तीवर, 8 लाख रुपयांचा दंड वसूल

Sanjay Raut On Modi: एक पुतीन दिल्लीत बसलेत, ते रोज आमच्यावर मिसाईल सोडताहेत; राऊतांची फटकेबाजी

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.