Wardha Crime | माझ्याशी बोलली नाहीस तर अंकितासारखे जीवाने ठार मारेन, वर्ध्यात धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दारोड्यातील आरोपी प्रतीक गायधने याने मोबाईलवर फोन करून तू माझा क्रमांक ब्लॅक लिस्टमध्ये का टाकला. माझ्याशी बोलत का नाहीस, असे म्हटले. युवतीने मला तुझ्याशी बोलायचे नाही असे म्हणून फोन कट केला. मात्र, पुन्हा आरोपी प्रतीक याने फोन करून तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर तुलाही अंकितासारखे जीवे ठार मारेन असे म्हटले. घाबरलेल्या युवतीने पुन्हा फोन बंद केला.

Wardha Crime | माझ्याशी बोलली नाहीस तर अंकितासारखे जीवाने ठार मारेन, वर्ध्यात धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
र्ध्यात धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 9:28 AM

वर्धा : हिंगणघाट येथील शिक्षिकेच्या जळीत कांड प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरा बसला होता. त्या प्रकरणाच्या आरोपीला काही महिन्यापूर्वीच मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा हिंगणघाट न्यायालयाने (Hinganghat Court) सुनावली आहे. या प्रकरणातील पीडिता ज्या गावातील होती त्याच गावातील एका युवतीला तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर तुलाही अंकितासारखे जाळून जिवे मारुन टाकेल, असे म्हणत युवतीचा विनयभंग ( molestation of a young woman) केल्याची घटना समोर आलीय. ही घटना दारोडा गावातील बसस्थानक परिसरात घडला. याप्रकरणी युवतीने वडनेर पोलिसात (Wadner Police) तक्रार करताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. त्यामुळं अनुचित प्रकारावर आळा घातला आला. यापूर्वी अशाच एका प्रकरणात अंकिता नावाच्या प्राध्यापक युवतीवर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं.

माझा मोबाईल ब्लॅक लिस्टमध्ये का

अठरा वर्षीय युवती हिंगणघाट येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याने ती महाविद्यालयात गेली. दरम्यान, दारोड्यातील आरोपी प्रतीक गायधने याने मोबाईलवर फोन करून तू माझा क्रमांक ब्लॅक लिस्टमध्ये का टाकला. माझ्याशी बोलत का नाहीस, असे म्हटले. युवतीने मला तुझ्याशी बोलायचे नाही असे म्हणून फोन कट केला. मात्र, पुन्हा आरोपी प्रतीक याने फोन करून तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर तुलाही अंकितासारखे जीवे ठार मारेन असे म्हटले. घाबरलेल्या युवतीने पुन्हा फोन बंद केला.

तुझ्या आईवडिलांसमोर उचलून नेतो

युवती ही महाविद्यालयातून बसने घरी गेली. दारोडा बसस्थानकावर पोहचताच प्रतीक याने युवतीशी असभ्य वर्तन केले. ओढताण करीत तुला तुझ्या आई वडिलांसमोर घरातून उचलून घेऊन जातो, असे म्हणून तेथून निघून गेला. यामुळं युवती प्रचंड घाबरली. आता काय करावे, तिला काही सूचना. शेवटी तीनं पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला. घाबरलेल्या युवतीने याबाबतची तक्रार वडनेर पोलिसात दिली. पोलिसांनी तत्काळ दखल घेत या प्रकरणातील आरोपी प्रतीक गायधने याला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचन पांडे करीत आहेत. पोलिसांनी वेळीच आरोपीला अटक केली. त्यामुळं मोठ्या दुर्घटनेपासून ती बचावली. अन्यथा प्रतीकनं काय केलं असत काही खरं नाही. म्हणून वेळीच सावध होणं आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.