लोकसभेसाठी ‘मविआ’ने स्थानिक उमेदवारच द्यावा: ‘या’ जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी भूमिका मांडली

लोकसभा निवडणुका लांब असल्या तरी वर्धा जिल्ह्यात मात्र स्थानिक नेत्यांनी आता निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांच्या आतापासून महाविकास आघाडीकडे मागण्या वाढल्या आहेत.

लोकसभेसाठी 'मविआ'ने स्थानिक उमेदवारच द्यावा: 'या' जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी भूमिका मांडली
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 4:48 PM

वर्धाः लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच अवकाश आहे पण, त्या अनुषंगाने चर्चा मात्र जोरदार सुरू झाल्या आहेत. वर्धा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं स्थानिक उमदेवारच द्यावा, बाहेरचा उमेदवार देऊ नये, अशी मागणी स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली आहे. तशी भूमिका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

वर्ध्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विश्रामगृहात पत्रकार परिषदेचं आयोजन केले होते. त्यावेळी नेत्यांनी लोकसभा उमेदवाराविषयी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत.

ही भूमिका वरिष्ठांनाही सांगणार असल्याचं नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सद्यस्थिती बघता आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असं वाटत असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले आहे.

महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला उमेदवारी मिळू शकते. त्यामुळं कोणत्याही पक्षाचा उमेदवार दिला तरी तो स्थानिकच असावा, बाहेरचा उमदेवार देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी बाहेरच्या उमेदवारांची नावं घेण्याच मात्र नेत्यांनी टाळलं आहे. शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य राहिल असंही मत यावेळी व्यक्त करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश देशमुख, माजी आमदार राजू तिमांडे, अ‍ॅड. सुधीर कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल देवतारे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश समिती सचिव शेखर शेंडे, माजी शहर अध्यक्ष राजेंद्र शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष ईक्राम हुसेन, प्रमोद हिवाळे उपस्थित होते..

लोकसभा निवडणुकीला अजून वेळ आहे मात्र स्थानिक पातळीवर राजकीय कार्यक्रमांनी प्रचंड वेग घेतला आहे. वर्धा जिल्ह्यात काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेत्यांची नावंही चर्चेला येऊ लागली आहेत.

त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्थानिक उमेदवार देण्याचीच भूमिका जाहीर केल्याने मविआ काय निर्णय घेणार त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.