Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Environment | स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार देतात पर्यावरण संवर्धनाचा संदेश, सेवाग्राम आश्रमात दिग्गजांनी लावलेल्या झाडांकडून मिळते सावली अन् प्राणवायू

सध्या विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड केली जात आहे. त्यामुळे वसुंधरेला गतवैभव मिळून देणे ही काळाची गरजच आहे. येत्या पावसाळ्यात प्रत्येक व्यक्तीने एक रोपटे लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारल्यास वसुंधरेला तिचे गतवैभव मिळून देण्यासाठी मोठा फायदाच होणार आहे.

Wardha Environment | स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार देतात पर्यावरण संवर्धनाचा संदेश, सेवाग्राम आश्रमात दिग्गजांनी लावलेल्या झाडांकडून मिळते सावली अन् प्राणवायू
स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार देतात पर्यावरण संवर्धनाचा संदेशImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 3:12 PM

वर्धा : एकीकडे वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. प्रदूषण तसच विविध कारणांनी पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. या स्थितीत वृक्ष लागवड, संवर्धनाचा प्रश्न सर्वांच्या जिव्हाळ्याचा झाला असला तरी अनेक बोलण्याचा पुढं फारस काही करताना दिसत नाही. अशात स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देणारा सेवाग्राम आश्रम आज वृक्ष संवर्धन पर्यायाने पर्यवरण संवर्धनाची दिशा देण्यास प्रेरक ठरतोय. इथली वृक्ष संपदा, त्यांची सावली शीतलता देत पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षांचं महत्व अधोरेखित करते. जमनालाल बजाज (Jamnalal Bajaj) यांच्या विनंतीनंतर १९३६ साली महात्मा गांधी (Mahatma Gandhi) वर्ध्यात आलेत. त्यांनी तत्कालीन सेगावात आश्रम करण्याचे निश्चित केले. स्वातंत्र्य चळवळीला याच आश्रमातून महात्मा गांधी यांनी दिशा दिली. त्यामुळे सेवाग्रामचा गांधी आश्रम स्वातंत्र्य चळवळीचा (Freedom Movement) साक्षीदारच आहे.

महात्मा गांधींनी लावले होते पिंपळवृक्ष

शिवाय आजही तो संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहेच. तर, सध्याच्या विज्ञानयुगात येथील निवास, बापू कुटी, ‘बा’कुटी, आखरी निवास, महादेव कुटी, किशोर कुटी आदी ऐतिहासिक ठेवा असलेला सेवाग्रामचा गांधी आश्रम वृक्ष संवर्धनाचाही संदेश देत आहे. सेवाग्राम आश्रम परिसरात महात्मा गांधी यांनी 1936 मध्ये पिंपळवृक्ष लावून वृक्षाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले होते. तो वृक्ष आजही आश्रमात कायम आहे. त्यानंतर येथे अनेक दिग्गजांनी विविध प्रजातींची रोपटे लावली. ते रोपटे डेरेदार वृक्षात परावर्तित होऊन या आश्रम परिसरात असून मागील अनेक वर्षांपासून आश्रमात येणाऱ्यांना सावली व प्राणवायू देत आहे.

wardha

सेवाग्राम आश्रमात दिग्गजांनी लावलेली झाडांकडून मिळते सावली अन् प्राणवायू

आश्रम देशी वृक्षांनी नटलेला

सध्या शासन-प्रशासन स्तरावरून विविध उपक्रमांच्या माध्यमातून वृक्षलागवड व संगोपन चळवळ उभी केली जात आहे. ती काळाची गरजही आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार वृक्ष संवर्धनाचा संदेश देत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. जगासाठी प्रेरणास्थान असलेल्या आणि रचनात्मक कार्याची मुहूर्तमेढ रचणारा महात्मा गांधीजींचा आश्रम देशी वृक्षांनी नटलेला आहे. आधुनिक काळातही वृक्षारोपण, संवर्धनाचा आणि पर्यावरणाचा संदेश देण्याचे महान कार्य आजही डेरेदार वृक्ष देत असल्याचे दिसून येते. सेवाग्राम येथील गांधी आश्रमात पिंपळ, बकुळ, बेल, कडुनिंब, रक्तचंदन, आवळा आदी विविध झाडे आहेत.

हे सुद्धा वाचा

या दिग्गजांनी लावली झाडे

सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी यांनी सन 1936 मध्ये पिंपळाचे वृक्ष, कस्तुरबा गांधी यांनी सन 1942 मध्ये बकुळचे वृक्ष,आचार्य विनोबा भावे यांनी सन 1965 मध्ये पिंपळचे वृक्ष, तर इंदिरा गांधी यांनी सन 1972, राजीव गांधी यांनी सन 1086, सोनिया गांधी यांनी सन 2010, राहुल गांधी यांनी सन 2014 मध्ये बकुळचे वृक्ष, डॉ. प्रणव मुखर्जी यांनी सन 2014, मनेका गांधी यांनी सन 2016 परत सोनिया गांधी यांनी सन 2018, डॉ. मनमोहन सिंह यांनी सन 2018, राहुल गांधी यांनी सन 2018, रामनाथ कोविंद यांनी सन 2019 मध्ये रक्तचंदनचे वृक्षारोपण केले.

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.