Wardha Congress | तुम्ही असाच मोर्चा नितीन गडकरी साहेबांकडे न्या, खासदार रामदास तडस यांचा काँग्रेस आंदोलकांना सल्ला

रस्त्याचं काम करायचं तर मार्ग मी सांगतो. असाच मोर्चा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांकडे नेला तर तुमचं दोन दिवसात काम होते. हा सल्ला दिलाय वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांनी. थेट गडकरींकडे मोर्चा नेण्याचा सल्ला तेही भाजपाच्याच खासदारांनी दिल्यानं उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला.

Wardha Congress | तुम्ही असाच मोर्चा नितीन गडकरी साहेबांकडे न्या, खासदार रामदास तडस यांचा काँग्रेस आंदोलकांना सल्ला
खासदार रामदास तडस यांचा काँग्रेस आंदोलकांना सल्लाImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 5:52 PM

वर्धा : केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत आर्वी तळेगाव (Arvi Talegaon) हा बारा किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकाम तीन वर्षपूर्वी सुरु झाले होते. काम सुरु झाल्याच्या काही दिवसातच रस्ता खोदून कंत्राटदाराने (Contractor) रस्त्याचे काम बंद केले. रस्त्याचे काम मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने नागरिकांना या मार्गांवर नेहमीच तारेवरची कसरत करत वाहन चालवावी लागत आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे या मागणीसाठी अनेक आंदोलन करण्यात आले. मात्र अद्यापही काम सुरु न झाल्याने आर्वी येथील काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे (Amar Kale) यांच्या नेतृत्वात वर्धेच्या खासदार रामदास तडस यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शन केली. दरम्यान खासदार रामदास तडस हे आंदोलकांच्या भेटीला येत मागण्या समजून घेतल्या.

तडस म्हणाले, मीसुद्धा तुमच्यासोबत येतो

खासदार रामदास तडस यांनी आंदोलकांशी चर्चा करत असताना माझी इच्छा आहे, तुम्ही असाच मोर्चा गडकरी साहेबांजवळ नेला तर तुमचं काम दोन मिनिटात होते. कारण त्यांनाही माहीत पडलं पाहिजे. मी तुमच्या भावनांशी सहमत आहे. वेळ पडल्यास मी सुद्धा तुमच्यासोबत येतो, असे वक्तव्य केले. दुसरीकडे काँग्रेसकडून बुधवारी आर्वी तळेगाव मार्गाचे काम सुरु करण्यासाठी हवन पूजन आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी खासदाराला येण्याची गळ घातली. यावर खासदार तडस यांनी बुधवारी आर्वीला येत अधिकाऱ्यांशी चर्चा करून आंदोलनात सहभागी होणार असल्याच सांगितलं.

तीन वर्षांपासून काम रखडले

रस्त्याचं काम करायचं तर मार्ग मी सांगतो. असाच मोर्चा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांकडे नेला तर तुमचं दोन दिवसात काम होते. हा सल्ला दिलाय वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांनी. थेट गडकरींकडे मोर्चा नेण्याचा सल्ला तेही भाजपाच्याच खासदारांनी दिल्यानं उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करण्याचा प्रस्ताव डिसेंबर 2021 मध्ये नॅशनल हायवे विभागाकडून केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे. मात्र सहा महिने लोटूनही यावर कोणताच तोडगा निघाला नाहीय. यामुळे आता नागरिक रस्ता बांधकामावरून संतप्त होताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.