ही दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात, वाशिममध्ये दोन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली

| Updated on: Aug 07, 2023 | 6:22 PM

वाशिम जिल्ह्यात आज एक दुमजली इमारत कोसळली आहे. इमारत कोसळल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या लगत ही इमारत होती. त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती. पण सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

ही दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात, वाशिममध्ये दोन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली
Follow us on

वाशिम | 7 ऑगस्ट 2023 | वाशिम जिल्ह्यात आज एक दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. संबंधित इमारत ही खरंतर जुनी होती. पण इमारत कोसळल्याची घटना अतिशय भयानक होती. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण ही घटना अतिशय चित्तथरारक अशी होती. या इमारतीत कुणी वास्तव्यास असतं तर मोठी हानी झाली असती. अवघ्या दहा सेकंदात या इमारतीचं होत्याचं नव्हतं होतं. संबंधित घटना कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे कैद झालीय. दुर्घटनेचा व्हिडीओ पाहून आपलं मन विचलित होऊ शकतं. पण सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. त्यामुळे समाधान व्यक्त केलं जात आहे.

वाशिमच्या मालेगाव शहरातील मुख्य शिव चौकातील एक जुनी झालेली दुमजली इमारत आज अचानक कोसळली. सुदैवाने या रहदारीच्या रस्त्यावर इमारत कोसळत असताना वाहने नसल्याने आणि इमारतीमध्ये कोणीही राहत नसल्यामुळे यात कुठली जीवितहानी झाली नाही. मात्र इमारतीला लागून असलेली पानपट्टीवर इमारतीचा ढिगारा कोसळला. त्यामुळे नुकसान झालंय.

मालेगावच्या नागरिकांकडून महत्त्वाचा प्रश्न उपस्थित

इमारतीचा ढिगारा रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. संबंधित घटनेनंतर तातडीने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने इमारतीचा ढिगारा रस्त्यावरुन हटवण्याचं काम सुरू केलं.

मालेगाव शहरामध्ये काही जुन्या जीर्ण झालेल्या धोकादायक इमारतीचे नगरपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन त्याबाबत भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडल्यानंतर नगर पंचायत प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न या घटनेनंतर मालेगावतील नागरिक उपस्थित करत आहेत.