शैक्षणिक ऑनलाईन लोचा; विद्यार्थ्यांसह पालकांची वाढली चिंता

महा ऑनलाईन पोर्टल त्वरित सुरू करावे. गरजूंना दाखले देण्याची मागणी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी सरकारला केली आहे.

शैक्षणिक ऑनलाईन लोचा; विद्यार्थ्यांसह पालकांची वाढली चिंता
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 3:55 PM

वाशिम : शिक्षणाचा सध्या ऑनलाईन लोचा झाला आहे. शैक्षणिक प्रवेशासह, शासकीय नोकरीसाठी आवश्यक कागदपत्र तयार करावे लागतात. सरकारने बहुतेक सर्व कागदपत्र ऑनलाईन केले आहेत. जातीचा दाखले, नॉन क्रिमिलेयर यासह विविध दाखले महा ऑनलाईन साईटवर उपलब्ध होतात. पण, सर्व्हर डाऊन पडल्याने मागील 10 दिवसांपासून हे काम प्रलंबित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली. महा ऑनलाईन पोर्टल त्वरित सुरू करावे. गरजूंना दाखले देण्याची मागणी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी सरकारला केली आहे.

विद्यार्थी, पालकांची चिंता वाढली

राज्यात अकरावी, तंत्रनिकेतन, आयटीआयसह अनेक वर्गातील प्रवेश प्रक्रियांची अंतिम मुदत संपत आली. परंतु, प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थ्यांना जात, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलेयरसह विविध दाखले मागील 10 दिवसांपासून मिळत नाही. कारण महा ऑनलाईन पोर्टल हँग झालेय. सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थी, पालकांची चिंता वाढली आहे. या प्रमाणपत्रांना विलंब होत आहे. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशाची चिंता सतावत आहे. महा-ई-सेवा केंद्र आणि तहसील कार्यालयातील यंत्रणेलाही मोठा मनस्ताप होत आहे.

WASHIM 2 N

कागदपत्रांअभावी प्रवेश रखडले

पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रियेची अंतिम मुदत संपत आली. मात्र, आवश्यक प्रमाणपत्र नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश महाविद्यालयाकडून नाकारले जात आहेत. त्यासाठी राज्य सरकारने यावर तोडगा काढावा. लवकरात लवकर प्रमाणपत्र आणि दाखले द्यावे. विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता दूर करण्याची मागणी सेतू केंद्र चालक राजू खडसे यांनी केली.

शासनाने पोर्टल सुरू करण्याची मागणी

सेतू केंद्र चालक राजू खडसे म्हणाले, सेतू चालकांचे पोर्टन महा ऑनलाईन आहे. गेल्या दहा दिवसांपासून ते बंद आहे. सर्व्हर एरार असल्याचे ग्राहक परत जातात. विद्यार्थ्याचे कोणत्याही प्रकारची ऑनलाईन कामे होत नाहीत. दहावी, बारावीचा निकाल लागल्यानंतर त्यांना विविध कागदपत्र लागतात. ही कागदपत्र नसल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऑनलाईन लोचा झाल्याने कागदपत्र मिळण्यास विलंब होत आहे. शासनाने हे पोर्टल सुरळीत सुरू करण्याची गरज आहे. रात्रही साईट मेंटनन्समध्ये असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.