AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीन, कापूस, तूर पाण्यात; शेकडो विहिरी झाल्या जमीनदोस्त, शेतकऱ्यांपुढं मोठं संकट

सोयाबीन, कापूस, तूर पूर्णतः पाण्यात वाहून गेली. तर 120 विहिरी जमीनदोस्त झाल्यात. यात अनेक मोटार खराब झाल्या आहेत.

सोयाबीन, कापूस, तूर पाण्यात; शेकडो विहिरी झाल्या जमीनदोस्त, शेतकऱ्यांपुढं मोठं संकट
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 3:59 PM

वाशिम : वाशिम जिल्ह्यात काल झालेल्या पावसाने हाहाकार माजवून ठेवला आहे. कारंजा आणि मानोरा तालुक्यातील नदी नाल्यांना मोठे पूर आले होते. त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती. तर शेकडो हेक्टर शेती खरडून गेली आहे. त्याचबरोबर शेकडो गावांना पुराच्या पाण्याने विळखा घातला होता. बऱ्याच घरात पाणी शिरलं होत काही घरांची पडझड झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

पुराचा ५१ गावांना फटका

वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कारंजा आणि मानोरा तालुक्यात झालाय. कारंजात 50.8 मिमी तर मानोऱ्यात 64.9 मिमी पावसाची नोंद झाली तर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मानोरा तालुक्यातील उमरी मंडळात झाला आहे. तिथे 95.8 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात 14 घरांची पडझड झाली आहे. दोन जनावरं दगावली आहेत. जिल्ह्यातील कारंजा आणि मानोरा तालुक्यातील बेंबळा, साखळी, उमा, कापशी, कमळगंगा आणि इतर नदी नाल्याला पूर आल्याने 22 गावांचा संपर्क तुटला होता. तसेच दोन्ही तालुक्यातील 51 गावांना फटका बसला. नदीकाठची जमीन पुरामुळे खरडून गेल्याने हजारो हेक्टरवरील पिकं वाहून गेली आहेत.

घरांचे, शेतीचे नुकसान

मानोरा तालुक्यातील बेलोरा गावाला खोराडी नदीचा तर वरोली आणि कारखेडा, तडप गावाला अरुणावती नदीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता तर पोहरादेवी, गव्हा,धानोरा गाडगे, कोंडोली, सावळी फुलउमरी,वाटोड, नायगाव या गावतही पुराचे पाणी शिरले आहे.या पुरामुळे गावातील घरांचे आणि शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे..

ढगफुटी सदृश्य पाऊस सकाळी सात ते बारावाजतापर्यंत पाच तास पावसाने झोडपून काढले. फुलउमरी, रतनवाडी, सोमेश्वरनगर, उमरी बु, उमरी खुर्द, शेंदोना, आमदरी, शिवणी, हातोली गावातील नाल्या काठचे शेतातील पिके वाहून गेली. अनेक शेतीला तळ्याचे रूप आले होते. सोयाबीन, कापूस, तूर पूर्णतः पाण्यात वाहून गेली. तर, 120 विहिरी जमीनदोस्त झाल्यात. यात अडून अनेक मोटारी खराब झाल्या आहेत, अशी माहिती सरपंच मंगल चव्हाण यांनी दिली.

शेतात कंबरभर पाणी

फुलउमरी येथील निळकंठ राठोड यांच्याकडे 20 एकर शेती आहे. यांच्या शेतात सोयाबीन, कापूस पेरलेले होते. पूर्णतः शेत पाण्याखाली गेलं होतं. कंबरभर पाणी शेतामध्ये साचलं. त्यात अतोनात नुकसान झालं. तसेच शेतातील चार विहिरी खचून गेल्याने आर्थिक संकटात सापडले आहे.

पशुपालन व्यवसायही संकटात

मानोरा तालुक्यातील पाळुदी येथील रामजी राठोड यांच्याकडे साडेचार एकर शेती आहे. त्या शेतामध्ये शेडनेटमध्ये पशुपालनचा व्यवसाय तसेच शेतामध्ये शेत पिकाचे नुकसान झाले. त्यासोबत विहीर पूर्णतः खचून गेली. शेतकरी रामजी राठोड हे पंचनामे करून भरीव मदत मागील आहेत.

मानोरा तालुक्यातील सावळी, शेंदोना, पोहरादेवी, उमरीसह अनेक ठिकाणच्या शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. शेतकरी हतबल झाला आहे. या शेत नुकसानीचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलीय.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.