Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim Murder | वाशिममध्ये पुजाऱ्याचा खून, उमरा दुर्गा मंदिरातील घटना; धारदार शस्त्राने भोसकले

पुजारी पुंड यांचा मुलगा गणेश मारोती पुंड हा सकाळी 5 वाजता त्यांना उठवण्यासाठी गेला. तेव्हा वडिलांचा खून झाल्याचं त्याच्या निदर्शस आले. वडिलांना रक्ताच्या थारोड्यात पाहून तो घाबरला. त्याने शेजारच्यांना माहिती दिली.

Washim Murder | वाशिममध्ये पुजाऱ्याचा खून, उमरा दुर्गा मंदिरातील घटना; धारदार शस्त्राने भोसकले
वाशिममध्ये पुजाऱ्याचा खूनImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 2:15 PM

वाशिम : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या केकत उमरा शिवारात दुर्गा मंदिर (Durga Temple) आहे. या दुर्गा माता मंदिरातील पुजारी मारोती लक्ष्मण पुंड (Maroti Pund) यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. त्यांच्या मानेवर वार करून खून झाल्याने खळबळ उडाली आहे. मारोती पुंड यांनी अंदाजे 12 वर्षांपूर्वी केकत उमरा ते वाशिम रोड लगत असलेल्या स्वतःच्या शेतात दुर्गा माता मंदिराची स्थापना केली होती. तिथे ते नियमित पूजा अर्चा करीत असत. मंदिरात हत्या झाल्याने सुरवातीला चोरीचा उद्देश असावा असा पोलिसांचा (Washim Police) अंदाज होता. मात्र, मंदिरातील इतर साहित्य शाबूत असल्याने, संपत्ती किंवा इतर वैयक्तिक कारणाने खून झाल्याचा अंदाज पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीचीच्या आधारे व्यक्त केला जात आहे.

अशी घटना आली उघडकीस

पुजारी पुंड यांचा मुलगा गणेश मारोती पुंड हा सकाळी 5 वाजता त्यांना उठवण्यासाठी गेला. तेव्हा वडिलांचा खून झाल्याचं त्याच्या निदर्शस आले. वडिलांना रक्ताच्या थारोड्यात पाहून तो घाबरला. त्याने शेजारच्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. वाशिम पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वाशिम पोलीस डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांच्या मदतीने मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. खून कोणत्या उद्देशाने केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

का केला असावा खून

मारोती पूंड हे पूजारी आहेत. गेल्या बारा वर्षांपासून ते मंदिरात राहतात. अशा व्यक्तीची कुणीशी आणि का दुश्मनी असेल, असा प्रश्न पडतो. सुरुवातील चोरीच्या उद्देशाने खून केला असावा, असा संशय होता. पण, नंतर असं काही दिसून आलं नाही. त्यामुळं पूजाऱ्यांचे कुणाशी भांडण झाले होते का. काही कुणाशी वैर होते का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.