Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayan Rane | तीन पक्षांचं सरकार जूनमध्ये कोसळणार; वाशिममध्ये नारायण राणे यांनी वर्तविले भाकीत

संजय राऊत यांनी ब्लॅकमेल करून संपत्ती जमवली आहे. पत्रकाराचा पगारचं किती असतो, अशा शब्दात नाराणय राणे यांनी राऊतांचा समाचार घेतला. तर, तीन पक्षांच झाड जूनमध्ये कोसळणार, असं भाकीतही राणे यांनी वाशिममध्ये केलं.

Narayan Rane | तीन पक्षांचं सरकार जूनमध्ये कोसळणार; वाशिममध्ये नारायण राणे यांनी वर्तविले भाकीत
Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 5:20 PM

वाशिम : देश आत्मनिर्भर बनावा यासाठी गेल्या 7 वर्षात अनेक योजना जाहीर केल्या. अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वाशिम येथे दिली. राज्य शासनाचे पैसे येत नाहीत. राज्य शासन राजकारण जास्त विकास कमी करते, अशी टीका नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली. पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांनी देश आत्मनिर्भर बनाव याकरिता 30 योजना आणल्या. अंमलबाजावणी होतंय का हे पाहण्यासाठी वाशिम इथं आलो, असं राणे म्हणाले. जीडीपीचा 50 टक्के वाटा माझ्या खात्याचा आहे. सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. योजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे. अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करणार आहे, असंही ते म्हणाले. वाशिम जिल्ह्यातील चांगले शिक्षण मिळावे. आरोग्य (Health) चांगले राहावे याकरिता मंत्री म्हणून मी कटिबद्ध आहे. मराठा आरक्षणाबद्दल हस्तक्षेप करण्याचा अधिकार सदावर्तेंना नाही. आपल्या प्रगतीपेक्षा नागरिकांच्या अपेक्षांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत राणे यांनी व्यक्त केलंय.

संजय राऊतांना पत्रकार समजत नाही

राज्य शासन विकासाला पैसे देत नाही. शिवसेनेला मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार मिळत नाही. आधी सामनामध्ये राज ठाकरे यांना हिंदुत्ववादीचा औवैसी म्हटलं. आता खोमेनी म्हटलं यावर नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत यांचा पगार किती मला माहीत आहे. साध्या पत्रकाराला पगार किती आणि तो प्लॉट तरी घेऊ शकतो का. त्यांनी ब्लॅकमेल करून संपत्ती मिळवली आहे. संजय राऊतांची संपत्ती जप्त ईडीने जप्त केली. त्यांची बोलण्याची लायकी नाही. संजय राऊतांबद्दल प्रश्न विचारू नका. मी संजय राऊतला पत्रकार समजत नाही. मुंबईत आज भाजपचं पोलखोल रथाची तोडफोड झाली. त्यावर नारायण राणे म्हणाले की, हे असे बालीश काम फक्त शिवसेनाच करते. हे कितीही तोडफोड केली तरी आम्ही मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार उघड करणारच, असंही ते म्हणाले.

तीन पक्षांचं झाड जूनमध्ये कोसळणार

बेकायदेशीर भोंगे काढले पाहिजे असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं. तीन पक्षाचं झाड जून महिन्याच्या आत कोसळणार असं भाकितही राणे यांनी केलंय. मी बेकायदेशीर काम केलं नाही. मुंबई मनपाने जी नोटीस पाठवली त्यावर नारायण राणे म्हणाले की, मी जो बंगला बांधला त्याची संपूर्ण ओसी घेऊन बांधलेला आहे. त्यात इल्लिगल काहीही नाही आणि शेवटी जर कारवाई केली तर माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मात्र सुडाच्या राजकारणाने माझ्यावर नोटिशी पाठवत आहेत. पावसाचा अंदाज हे हवामान खात्याकडून घेऊन त्याचा अंदाज राजकारणासोबत जोडलं जातं. मात्र लोकशाहीवर भरवसा आहे. तीन मिनिटांत कॅबिनेटची बैठक उरकवणारे असे कुठले मुख्यमंत्री असतात का, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. सेना-राष्ट्रवादी युतीवर नारायण राणे म्हणाले, जर युती झाली आणि शिवसेना नेतृत्व करत असेल तर वाटोळं झालं असं समजून घ्या, असं उत्तर नारायण राणे यांनी दिलं.

Curfew in Achalpur | अचलपुरात संचारबंदीचा दुसरा दिवस, शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा पुढं ढकलल्या; गावात तणावपूर्ण शांतता

Video Dilip Walse Patil | राज्यातील काही संघटना दंगली घटविण्याच्या प्रयत्नात, पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना

Ramdas Athawale on Raj Thackeray | एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे; नागपुरात रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर टीका

कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....
प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक
प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक.
औरंगजेबने संभाजींना मनुस्मृतीप्रमाणे.., काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप
औरंगजेबने संभाजींना मनुस्मृतीप्रमाणे.., काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप.