घाव झेलायला पंकजा ताई, मलाई खायला मी, भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांचे संपूर्ण भाषण पाहा

तेही पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे मी आले. त्यामुळं सगळं घाव झेलायला पंकजा ताई आहे. मलाई खायला मी आहे.

घाव झेलायला पंकजा ताई, मलाई खायला मी, भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांचे संपूर्ण भाषण पाहा
प्रीतम मुंडे
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 9:52 PM

चैतन्य अशोक गायकवाड, नाशिक : येथील प्रोफेशनल या कार्यक्रमात खासदार प्रीतम मुंडे यांनी तडाकेबाज भाषण केलं. त्या म्हणाल्या, राजकारणात भाषणात जाती-जातीच्या भिंती पाडल्या पाहिजे, असं म्हणतो. ज्या जाती, धर्मात जन्म झाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. पण, जाती- पातीच्या भिंती पाडल्या पाहिजे. नागरिकाशास्त्रात मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, असं शिकतो. जाती-पातीच्या भिंती उभ्या करायच्या नाही. पण, सारख्या विचारांची माणस एकत्र राहतात. आपल्या राज्यात बरेच राजकारण सुरू आहे. महापुरुषाला जातीचं लेबल लागता कामा नये, असंही त्यांनी सांगितलं.

जातीवर प्रेम करा. पण, दुसऱ्याच्या जातीचा अवमान करू नका. प्रीतम मुंडे-खाडे आहे. एमडीची डिग्री झाली तेव्हा जेमजेम लग्न झालं होतं. प्रीतम मुंडे नावानं शिक्षण झालं होतं. त्यामुळं प्रीतम मुंडे नाव ठेवलं. आई-वडिलांनी खस्ता खाल्या. त्यामुळं मुंडे नाव कायम ठेवलं होतं. डिग्री सर्टीफिकेटवर नाव बदलवायचं नव्हतं. पण, कार्डवर मुंडे-खाडे असं नाव आहे, असंही त्यांनी उपस्थित युवकांनी सांगितलं.

स्वतःच्या पायावर उभ्या राहणार आहेत. आई-वडिलांचं नावही पुढं नेलं पाहिजे. असं मत प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केलं. नाशिकमध्ये प्रोफेशनलचा कार्यक्रम झाला. तसाच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात कार्यक्रम करावा. असंही प्रीतम मुंडे यांनी सुचविलं.

जन्म घेताना आपण ठरवत नाही. वैचारीक जाण-सामाजिक भान आल्यानंतर कळतं. तुम्ही ज्या समाजात जन्माला येतो. त्या समाजाला देणं लागतो. शैक्षणिक, नोकरी इतर ठिकाणी जातीचा आधार घेतो. त्यामुळं जातीसाठी काम करावं लागते, असं प्रीतम मुंडे यांनी सांगितलं.

राज्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांचं नाव मोठं आहे. जन्म गोपीनाथ मुंडे यांच्या घरी झाला. तेही पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे मी आले. त्यामुळं सगळं घाव झेलायला पंकजा ताई आहे. मलाई खायला मी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या घरी जन्म घेतलेल्या मुलीनं सांगू नये कष्ट काय करायचं ते, असं तुम्ही म्हणालं. पण, गोपीनाथ मुंडे कुठल्या मोठ्या माणसाच्या घरी जन्मले नव्हते, असंही त्या म्हणाल्या.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.