मुंबईकरांनो पाणी जपून वापरा ! भातसा धरणात बिघाड, 15 टक्के पाणी कपातीचा निर्णय
27 फेब्रुवारी 2022 रोजी भातसा धरणात 15 मेगावॅट विद्युत केंद्रात मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे मुंबईला होणा-या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पाणी पुरवठा सुरळीत व्हायला खूप वेळ लागणार आहे.
मुंबई – मुंबई शहराला (mumbai city) आणि उपनगराला पाणी पुरवठा करणा-या भातसा (bhatsa) धरणात (damp) पाणी सोडण्याच्या दरवाज्यामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने धरणातून होणारा पाणीपुरवठा 50 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे महापालिकेने 15 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. भातसा धरण हे राज्य शासनाच्या मालकिचे असल्याने त्यामध्ये विद्युत यंत्रणेत बदल झाल्याने मुंबईला होणारा पाणी पुरवठा कमी करण्यात आला आहे. ही पाणी कपात संपुर्ण मुंबईत होणार असून मुंबईकरांनी जपून पाणी वापरावे असे आवाहन अभियंता विभागातील अधिका-यांनी केले आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत तांत्रिक बिघाडाची दुरूस्ती होत नाही, तोपर्यंत पाणी कपात तशीच राहणार आहे.
मुंबईसह ठाण्यातही पाणी कपात
भातसा धरणाच्या दरवाज्यामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम ठाणे शहरातील पाणी पुरवठ्यावर सुध्दा झाला आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस ठाण्यात पुढील दोन दिवस पाणी कपात राहणार असल्याची माहिती मिळत आहे. भातसा धरणातून पाणी पुरवठा कमी होत असल्याने पिसे बंधा-यामधील पाण्यात 50 टक्के घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कमी दाबाने अपुरा पुरवठा होणार असल्याचे ठाणे महानगर पालिकेकडून सांगण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी वापरताना काळजी घ्यावी असं आवाहन ठाणे महापालिकेकडून करण्यात आले आहे.
दुरूस्ती होईपर्यंत पाणी कपात
27 फेब्रुवारी 2022 रोजी भातसा धरणात 15 मेगावॅट विद्युत केंद्रात मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे मुंबईला होणा-या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पाणी पुरवठा सुरळीत व्हायला खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या अनेक पाईपलाईनमधून गळती सुरू असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांची देखील दुरूस्ती करण्यात येणार आहे.
यंदा राज्यात चांगला पाऊस
यंदा राज्यात चांगला पाऊस झाल्याने पाणी टंचाई जाणवेल असे वाटत होते, परंतु तांत्रिक बिघाडामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाणी कपात होणार असल्याने पुढे कसे होईल अशी अनेकांना शंका निर्माण झाली असेल. अजून उन्हाळ्याचे तीन महिने काढायचे असल्याने पाणी जपून वापरावे. ही पाणी कपात संपुर्ण मुंबईत होणार असून मुंबईकरांनी जपून पाणी वापरावे असे आवाहन अभियंता विभागातील अधिका-यांनी केले आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत तांत्रिक बिघाडाची दुरूस्ती होत नाही, तोपर्यंत पाणी कपात तशीच राहणार आहे.