पाण्यासाठी उरुळी देवाची गावातील नागरिकांची जीवघेणी कसरत

Water Shortage in Pune | ऊरुळी देवाची गावासाठी यापूर्वीच पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च पुणे महानगर पालीकेच्यावतीने करण्यात आलेला आहे. शिवाय 10 दशलक्ष लिटर ची पाण्याची टाकीही कचरा डेपोजवळ बांधून बऱ्याच दिवसापासून तयार आहे.

पाण्यासाठी उरुळी देवाची गावातील नागरिकांची जीवघेणी कसरत
पाण्यासाठी उरुळी देवाची गावकऱ्यांची दैना
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 12:37 PM

पुणे: एकीकडे महाराष्टात ओला दुष्काळ असल्यासारखी परिस्थिती आहे.पुण्याजवळची सर्व धरणे पूर्ण भरली आहेत. ग्रेड A पुणे महापालिका असूनही दुष्काळी भागासारखी परिस्थिती उरुळी देवाची या गावातील लोकांची झाली आहे. पत्रे लिहली ,निवेदने दिली ,आक्रोश मांडला, पण महापालिका अजुन ही जागी होईना आणि उरुळीकरांची दैना संपेना. लाखो रुपये खर्च करून पुणे महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावाला बंद पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे काम पूर्ण होऊनही पाणी सुरू होत नाही.

मंतरवाडीत पाणी येते परंतु उरुळीत पाणी नाही. सध्या कोरोणाचा संसर्ग होऊ नये यासाठी टँकरला होणारी गर्दी टाळून पाइपलाइनने पाणी सरू करावी, अशी मागणी पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे भारिपचे शहराध्यक्ष व उरुळीचे माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी करूनही कोणत्याही प्रकारची दखल आजपर्यंत घेतली नाही.त्यामुळे पाण्याचा टँकर आला की लोकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे या परिसरात कोरोनाचा प्रसार वाढू शकतो, अशी भीती स्थानिकांनी बोलून दाखविली.

मग आम्हाला पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा का नाही, ग्रामस्थांचा सवाल

ऊरुळी देवाची गावासाठी यापूर्वीच पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च पुणे महानगर पालीकेच्यावतीने करण्यात आलेला आहे. शिवाय 10 दशलक्ष लिटर ची पाण्याची टाकीही कचरा डेपोजवळ बांधून बऱ्याच दिवसापासून तयार आहे. कचराडेपो परिसरात नलीकेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्याप्रमाणे ऊरूळी देवाची गावाला का केला जाऊ शकत नाही. सध्याची परिस्थिती करोनामुळे गंभीर आहे. पुण्यातील वाढता कोरोना चा धोका लक्षात घेऊन जिथे जिथे गर्दी टाळता येईल तिथे गर्दी टाळू शकतो व कोरोनाला थांबवू शकतो. त्याप्रमाणे उरुळी देवाची येथील टँकर बंद करून परिसरातील नागरिकांना गर्दीपासून रोखणे शक्य आहे .तरीही महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अतुल बहुले यांनी केला आहे.

लहान मुलांना टँकरवर चढून पाणी भरण्याची वेळ

टँकरच्या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर गर्दी करुन पाणी भरणे धोक्याचे आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे लोकांच्या त्रासात आणखीनच भर पडत आहे. कामगार लोकांना पाणी भरल्याशिवाय कामाला जाता येत नाही . लहान मुलांना ही टँकरवर चढून पाणी भरावे लागते. त्यामुळे या भागात त्वरीत पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

संबंधित बातम्या:

राज्याची चिंता वाढवणारी बातमी, पुण्यातील ‘या’ गावात डेल्टा प्लसचे 2 रुग्ण, आरोग्य यंत्रणा ॲलर्ट

पुण्यात तिसऱ्या लेव्हलचे कोरोना नियम, व्यापारी आक्रमक, “नियम बदला अन्यथा रस्त्यावर उतरणार”

तुळशीबाग मार्केटमध्ये पुणेकरांची तुफान गर्दी, कोरोना नियमांना हरताळ

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.