पाणीपुरवठा बंद असल्याने आज नाशिककरांची निर्जळी; उद्याही कमी दाबाने पाणी, जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू

नाशिकमध्ये आज पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती अनेक भागातल्या नागरिकांना नव्हती. त्यामुळे त्यांची चांगलीच तारंबळ उडाली.

पाणीपुरवठा बंद असल्याने आज नाशिककरांची निर्जळी; उद्याही कमी दाबाने पाणी, जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 1:07 PM

नाशिकः नाशिकचा पाणीपुरवठा शनिवारी दिवसभर बंद राहणार असून, उद्या रविवारीही कमी दाबाने पाणी येईल, असे महापालिकेच्या (Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागातर्फे कळवण्यात आले आहे. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तो सोमवारीच सुरळीत होण्याची शक्यता आहे.

येथे सुरू दुरुस्ती

गंगापूर आणि मुकणे धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांची आज आणि उद्या दुरुस्ती करण्यात येत आहे. सोबतच त्र्यंबकरोड, आयटीआयसमोर शुद्ध पाण्याची ग्रॅव्हिटी मेन पाईपलाईनच्या दुरुस्तीचे कामही आहे. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन बदलण्याचे काम होणार आहे. गंगापूर धरणावरील पाईपाईलनालाही गळती लागली आहे. पंपिंग स्टेशन रस्त्यावर या गळतीच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यात भरास भर म्हणजे मुकणे धरणावर महावितरणचे काम सुरू आहे. येथे 220 के. व्ही. फीडर लाईनचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सोबतच रविवारी सकाळीही कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

अनेकांना झाला त्रास

नाशिकमध्ये आज पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती अनेक भागातल्या नागरिकांना नव्हती. त्यामुळे त्यांची चांगलीच तारंबळ उडाली. शक्यतो नाशिककरांना कधी पाणी चिंता नसते. त्यामुळे अनेकांना पाणी भरून ठेवायची सवय नाही. एका दिवसापुरते पाणी असते. त्यात वापरायचे पाणी शिल्लक राहतेही. मात्र, पिण्याचे पाणी हे दररोज ताजे भरले जाते. आज पाणीपुरवठा बंद असल्याने कित्येकांना जारचे पाणी विकत घ्यावे लागले. तर काहींनी बोअरवेलच्या पाण्यावर आजचा दिवस साजरा करायचा निर्णय घेतला. आता थेट सोमवारीच पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे दोन दिवस नाशिकरांची ओढाताण होणार आहे.

गंगापूर धरण भरले

नाशिककडे सुरुवातीला पाठ फिरवलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गोदावरी नदीला एका महिन्यात चक्क चारवेळेस पूर आला. या दमदार पावसामुळे नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरले आहे. शहर परिसारातील आणि जिल्ह्यातील इतर सारी छोटी-मोठी धरणे भरली आहेत. त्यामुळे नाशिककरांचा यंदाचा पाणीप्रश्न मिटला आहे. सोबतच मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील अप्पर वैतरणा धरणही यंदा तुडूंब भरले आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाणीचिंता कमी झाली आहे.

इतर बातम्याः

साहित्य संमेलनाचा यथासांग राजकीय कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांच्या हजेरीसह नेते आणि मंत्र्यांची फळीच व्यासपीठ गाजवणार

Nashik भाजी विक्रेत्याचा खून आर्थिक देवाण-घेवाणीतून; पोलिसांच्या अवघ्या 24 तासांत 2 संशयितांना बेड्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.