VIDEO: अफवांवर किंवा बदनामीच्या गोष्टींवर मी बोलणार नाही, यशवंत जाधव डायरी प्रकरणावर Aaditya Thackeray रोखठोक

शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरीवरून सुरू असलेल्या राजकारणावर शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

VIDEO: अफवांवर किंवा बदनामीच्या गोष्टींवर मी बोलणार नाही, यशवंत जाधव डायरी प्रकरणावर Aaditya Thackeray रोखठोक
अफवांवर किंवा बदनामीच्या गोष्टींवर मी बोलणार नाही, यशवंत जाधव डायरी प्रकरणावर Aaditya Thackeray रोखठोकImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 11:53 AM

रत्नागिरी: शिवसेनेचे (shivsena) उपनेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्या डायरीवरून सुरू असलेल्या राजकारणावर शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अफवांवर किती बोलायचं आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचं हे महत्त्वाचं आहे. आताच्या काळात अफवा किती पसरविल्या जात आहेत हे तुम्हीही पाहत आहात. इतरांकडून फिडिंग येतं आणि त्या अफवांच्या बातम्या होतात. त्या खोलात मी जाणार नाही. ज्या अधिकृत गोष्टी आहेत त्या बाहेर येतीलच. पण अफवांवर किंवा बदनामीच्या गोष्टींवर मी बोलणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. आदित्य ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. मीडियाशी संवाद साधताना ते बोलत होते.

राजकीय षडयंत्र चाललं आहे. ज्या ठिकाणी भाजपचं सरकार नाही तिथे या गोष्टी सुरू आहेत. या गोष्टीला कुठेही न घाबरता बिनधास्तपणे सामोरे जावं लागणार आहे. टक्कर द्यायला महाराष्ट्र सज्ज आहे. ज्या ज्या ठिकाणी यंत्रणा मागे लागल्या तिथे हे लोक तोंडावर पडत आहेत. राजकारण एका ठिकाणी, पण जे घाणेरडं राजकारण सुरू आहे, बदनामी सुरू आहे, अफवा सुरू आहे, यंत्रणाचा गैरवापर होत आहे हे कुठे तरी थांबलं पाहिजे. ही देशाची संस्कृती नाही. घाणेरड्या राजकारणाचा प्रकार थांबला पाहिजे. सत्तेतून बाहेर गेल्याचं जे नैराश्य येतं त्यातून विंडिक्टीव्ह पॉलिटिक्स सुरू आहे. हा धोकादायक प्रकार आहे महाराष्ट्रासाठी, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

नाराजी असेल तर दूर करू

तानाजी सावंत यांनी निधी वाटपावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्या ठिकाणी दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले असतात त्या ठिकाणी खदखद होते. पण ते सोडवण्याचा आमचा प्रयत्न सुरू असतो. राजकारणात असं थोडं पुढे मागे होत असतं. आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्रं आलो आहोत. त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत. सर्व खासदार आमदारांशी चर्चा केली तर सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक मतदारसंघाला न्याय दिला आहे. एक दोन लोकांना अधिकचं जास्त मिळतं, काहींना कमी मिळालं असेल तर त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

VIDEO: प्रदूषण होणार नसेल तर रिफायनरीला मान्यता देऊ, Aaditya Thackeray यांचं मोठं विधान

जळगावमध्ये कायदा हातात घेणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा; मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली नसतानाही दाम्पत्याला बेदम मारहाण

बीएस्सी नर्सिंग प्रवेशासाठी मुदतवाढ नाहीच, 31 मार्चपर्यंतच प्रवेशप्रक्रिया!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.