Weather Alert | विजांच्या कडकडाटासह सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापुरात पूर्वमोसमी पावसाची हजेरी; पुढील 5 दिवस महत्त्वाचे

भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगत राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासाह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. (weather alert rain in maharashra)

Weather Alert | विजांच्या कडकडाटासह सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापुरात पूर्वमोसमी पावसाची हजेरी; पुढील 5 दिवस महत्त्वाचे
पाऊस
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 6:52 PM

मुंबई : राज्यात उन्हाचा तडाखा कायम असताना काही ठिकाणी हवामानात (weather aler) बदल होत आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगत राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच हवामान खात्याने काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्याची प्रचिती आज पश्चिम महाराष्ट्रात दिसून आली. सिंधुदुर्ग, कोल्हापूर  तसेच सोलापुरात आज पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली.  (weather alert possibility of rain in Sindhudurg Kolhapur Solapur and rest of Maharashra next five days are important)

ढगांच्या गडगडाटासह पाऊस, गारपीट होण्याची शक्यता

राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाडा येथे पावसाच्या सरी बरसत आहेत. साताऱ्यात काही ठिकाणी गारपीटीसुद्धा नोंद झाली होती. या पार्श्वभूमीवर आता येत्या 1 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याची चाहूल महाराष्ट्रालासुद्धा लागली असून ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडतो आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी जिल्हास्तरीय हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यासाठी पुढील पाच दिवस महत्त्वाचे असणार आहेत. राज्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह काही टिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

सोलापुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस

भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक विभागाने सोलपुरात उद्या (8 मे) तुऱळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. 9 ते 11 मे या कालावधीमध्येसुद्धा अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वाशिममध्ये उडीद आंबा पिकांचे नुकसान

वाशिम जिल्ह्यातील वांगी, मोहजा, खंडाळा शिंदे परिसरात सलग  दुसऱ्या दिवशी जोरदार  पाऊस झाला. या पावसामुळे उन्हाळी मूग, उडीद तसेच आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस 

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज जोरदार पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळल्यामुळे अनेक गावांतील वीज पुरवठा खंडित झाला होता. तर मागील काही दिवसांपसून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेतील तालुक्यात पावसाची हजेरी 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात शिरोडा गावासह काही गावांमध्ये सकाळी 10 च्या सुमारास  ढगांच्या गडगडाटासह पूर्वमोसमी पाऊस झाला. अचानकपणे आलेल्या पावसामुळे येथे अनेकांची तारांबळ उडाली. तालुक्यात सध्या उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे गरमीने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
इतर बातम्या :

Monsoon | मान्सून 1 जून रोजी केरळात, हवामान विभागाचा अंदाज, राज्यात कुठे-कधी पाऊस?

(weather alert possibility of rain in Sindhudurg Kolhapur Solapur and rest of Maharashra next five days are important)
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.