Weather Forecast : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा ते विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अ‌ॅलर्ट जारी

भारतीय हवामान विभागानं (IMD) महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात पुढचे 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 

Weather Forecast : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा ते  विदर्भात मेघगर्जनेसह  पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अ‌ॅलर्ट जारी
हवामान अंदाज
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 3:09 PM

मुंबई: भारतीय हवामान विभागानं (IMD) महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात पुढचे 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.  बंगालच्या उपसागरातील कमी दा़बाच्या क्षेत्राचा प्रभावामुळं विदर्भ, सलंग्न मराठवाडा भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस होईऊ शकतो. त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. तर, हवामान विभागानं काही जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे.

उत्तर महाराष्ट्र ते विदर्भ यलो अ‌ॅलर्ट

उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

16 ऑक्टोबर- नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

17 ऑक्टोबर- नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा गोंदिया, औरंगाबाद, बीड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस

प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

केरळात परतीचा मान्सून बरसणार

परतीचा पाऊस दक्षिण भारतात पुन्हा पावसाचा धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. केरळ राज्यातील पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.कोट्टायम, एर्नाकुलम,त्रिसूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.भारतीय हवामान विभागानं सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. परतीचा मान्सून केरळ मध्ये मुसळधार कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इतर बातम्या:

Nitesh Rane | ‘..तर उद्धव ठाकरेंना आधी गेट आऊट केलं असतं’, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

नरेंद्र मोदींनी दादरा नगर हवेलीला यावं, प्रशासन इथल्या लोकांना गुलामासारखं वागवतंय ते पाहावं: संजय राऊत

Weather Forecast IMD issue rain alert to North Maharashtra Marathwada and Vidarbha for two days

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.