Weather Forecast : कोकण ते विदर्भ मराठवाड्यावर मुसळधार पावसाच संकट, IMD कडून नवा अंदाज जारी
भारतीय हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई: भारतीय हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुढील पुढच्या 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे. विजा चमकताना बाहेरची कामं टाळा, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे . ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
पुढच्या 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह?? जोरदार पावसाची शक्यता. विजा चमकताना कृपया बाहेरचे काम टाळा, त्या वेळी घराबाहेर पडू नका, त्यात जीवाला धोका असू शकतो.शक्यतो, अशा प्रकारचे तीव्र हवामान दुपार नंतर संध्याकाळी व रात्री पर्यंत असते. IMD ने दिलेले इशारे पहा pic.twitter.com/IwZkHyzTGR
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 3, 2021
कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार
प्रादेशिक हवामान विभागानं पावसाचे इशारे जारी केले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून यलो अॅलर्ट
4 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
5 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, नाशिक, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली 4 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर,
6 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे
7 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग
बीड माजलगावातील 40 बोअरेल पंप ओव्हरफ्लो
सतत दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. सलग एक आठवड्यात झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब वाहत आहेत. माजलगाव तालुक्यातील नाखलगाव येथील एकाच गावातील तब्बल 40 बोअर पंप ओव्हरफ्लो झाले आहेत. वीज जोडणी नसताना देखील पंपातून पाणी बाहेर पडत आहे. गत पंधरा वर्षानंतर बोअर पंप ओव्हरफ्लो होण्याची ही पहिलीच घटना आहे.
गेवराई तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येऊन अनेक नद्यांवरील पूल वाहून गेले आहेत. सध्या पाऊस थांबला असला तरी प्रशासनाकडून पुलांची अद्याप दुरुस्ती किंवा तात्पुरती उपाययोजना करण्यात आली नाही. चिंचोली ते नाथापुर हा रस्ता पूर्णपणे बंद पडला असून नदी दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून कसरत करावी लागेतय. अनेक वेळा दुचाकी घसरून नागरिक जखमी देखील होताना पहावयास मिळते आहे.
इतर बातम्या:
Nashik Rain | नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, सराफ बाजारही पाण्याखाली जाण्याची भीती
Osmanabad Rescue | उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं पुरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू
Weather Forecast IMD Predict heavy rain fall during next four and five days in various parts of Maharashtra