Weather Forecast : कोकण, मराठवाडा ते दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाकडून यलो ॲलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं पुढील चार दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. अरबी समुद्रातील हवामानाच्या स्थितीमुळं पुढील दोन तीन दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

Weather Forecast : कोकण, मराठवाडा ते दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाकडून यलो ॲलर्ट जारी
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 3:54 PM

मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं पुढील चार दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. अरबी समुद्रातील हवामानाच्या स्थितीमुळं पुढील दोन तीन दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

हवामान विभागाकडून अ‌ॅलर्ट जारी

पुढचे 2-3 दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून यलो अ‌ॅलर्ट जारी

5 नोव्हेंबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर,अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय.

6 नोव्हेंबर: रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, कोल्हापूर,जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

7 नोव्हेंबर

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय.

8 नोव्हेंबरला कोणताही अ‌ॅलर्ट जारी केलेला नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून ढगांचा जोरदार गडगडाट सुरू आहे. सलग तिस-या दिवशी अवकाळी पावसामुळे ऐन दिवाळीत नागरिकांची तारांबळ उडाली असून भात शेतीचेही मोठ्याप्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गेले तीन दिवस अचानक पडत असलेल्या पावसामुळे कापणी करून वाळत घातलेल्या भात पिकाचं शेतात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं आहे.

इतर बातम्या:

संजय राऊत न्यायाधीश झाल्यासारखं वागतात, प्रसाद लाड यांचा आरोप

कृषी कायद्याला विरोध सुरूच, शेतकऱ्यांनी हरयाणात माजी मंत्र्यासह भाजपचे नेते ओलीस, वाहनांची हवाही काढली

Weather Forecast imd predict rainfall in south kokan south Maharashtra and Marathwada within next two three days

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.