Weather Update : दडी मारलेला मान्सून पुन्हा परतणार, येत्या 4 ते 5 दिवसांत सक्रिय होणार
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयानं महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी राज्यात येत्या चार ते पाच दिवसात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयानं महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी राज्यात येत्या चार ते पाच दिवसात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर, पावसानं विश्रांती घेतल्यानं उकाडा वाढल्यानं नागरिक त्रस्त आहेत. तर पावसाचं प्रमाण कमी असलेल्या भागात शेतकऱ्यांसमोर पीक जगवण्याच आव्हान उभं राहिलंय.
के. एस. होसाळीकर यांचं ट्विट
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई ने दिलेल्या पूर्वानुमान प्रमाणे, येत्या ४,५ दिवसात राज्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता https://t.co/qTlM44cf8f
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 11, 2021
प्रादेशकि हवामान केंद्र, मुंबई यांनी जारी केलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी माहिती के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे.
वाशिममध्ये सोयाबीन करपू लागलं
वाशिम जिल्ह्यात यंदा सुरुवातीला जास्त पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकासह जमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी सावरत मशागत केल्याने सोयाबीन पिक चांगलं बहरले आहे.मात्र ऐन फुलं आणि शेंगा लागण्याच्या स्थितीत असताना गेल्या 15 दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यानं सोयाबीन पीक करपत आहे.त्यामुळं येत्या दोन तीन दिवसांत चांगला पाऊस झाला नाही तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकट येणार आहे. जिल्ह्यात एकूण 4 लाख हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास 3 लाख हेक्टरवर सोयाबीनच पीक घेतलं जाते त्यामुळं पावसाने दगा दिला तर जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात येणार आहे.
नंदूरबारमध्ये ऑक्टोबर हिटचा अनुभव श्रावण महिन्यात
नंदूरबार जिल्ह्यात श्रावण महिन्यात ऑक्टोबर हीटचा अनुभव जिल्ह्यात घेत आहेत. जिल्ह्यात तापमानाचा पारा चार अंशांनी वाढून 35 ते 36 अंशवर पोहोचला आहे. बाष्पयुक्त हवेमुळे पिकांवरही परिणाम होत असून सर्वत्र पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. श्रावणात पावसाच्या सरीचा अनुभव येतो मात्र नागरिक कडक उन्हाचां अनुभव नागरिक घेत आहेत. गेल्या दोन दिवसापासून तापमान वाढ झाली असून सरासरी 31 32 अंश असणाऱ्या तापमान 35.6 अंशापर्यंत गेले त्यामुळे उकाड्याने हैराण केले. वातावरणात बाष्पयुक्त हवा सुरू असल्याने जमिनीतील ओलावा कमी होत आहे त्याचा परिणाम पिकावर होऊ लागला आहे. सध्या स्थिती काही शेतकऱ्यांनी पंधरा दिवसापूर्वी पेरणी केली आहे त्यामुळे अशा धोका निर्माण झाला आहे.
बारामतीत तापमान 32 अंशावर…
जून आणि जुलैमध्ये बारामती परिसरात थोड्या प्रमाणात पाऊस झाला. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून बारामती शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्रतेमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. ऐन पावसाळ्यात उन्हाची एवढी तीव्रता वाढली आहे की रस्त्यावरील वाहतूक देखील मंदावली आहे. आज बारामतीतील तापमान हे 32 अंशावर गेले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.या उन्हाच्या तीव्रतेने शेतातील उभी पिके देखील धोक्यात येणार आहेत. त्यामुळे बळीराजा दमदार पावसाची वाट पाहत आहे.
इतर बातम्या:
राज, उद्धव यांचं सांगू नका, माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो, बच्चू कडूंचं रोखठोक उत्तर
“छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्” आशिष शेलारांनी सीईटीवरुन ठाकरे सरकारला डिवचलं
Weather Forecast IMD predicted low and medium rain in Maharashtra next four and five days heat increased in various districts