Weather Forecast : वर्षाच्या शेवटी सुद्धा पाऊस बरसणार, आयएमडीकडून विदर्भ मराठवाड्याला यलो ॲलर्ट जारी
हवामान विभागाकडून विदर्भ आणि मराठवाड्यात 28 आणि 29 तारखेला पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या राज्यात किमान तापमानात दिवसेंदिवस घट होतीय आणि ऐन थंडीच्या दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे : भारतीय हवामान विभागाच्यावतीनं राज्यात ऐन थंडीच्या दिवसात पुढील दोन दिवसात 28 आणि 29 तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आजपासून ( 26 डिसेंबर ) वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्यानं महाराष्ट्रात 28-29 डिसेंबरला मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा विदर्भाला यलो ॲलर्ट
हवामान विभागाकडून विदर्भ आणि मराठवाड्यात 28 आणि 29 तारखेला पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या राज्यात किमान तापमानात दिवसेंदिवस घट होतीय आणि ऐन थंडीच्या दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जालना, परभणी, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, गडचिरोली, गोंदीया, नागपूर,वर्धा, अमरावती या जिल्हयांना यलो अलर्ट देण्यात आलाय,
पुणे धुक्यात हरवलं
पुण्यातील आज सकाळचं तापमान 12 अंश नोंदवण्यात आलं. गुलाबी थंडीची मजा लुटण्यासाठी पुणेकरांची तळजाई टेकडीवर फिरण्यासाठी गर्दी केलेली दिसून आली. काल शिरूर तालूक्यात सर्वाधिक कमी 8 .9 डीग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. धुक्याबरोबरचं धुरक्याचंही प्रमाण वातावरणात जास्त आहे.
के. एस. होसाळीकर यांचं ट्विट
उद्या 26 डिसेंबरपासून वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता. राज्यात खाली दर्शविल्या प्रमाणे 28-29 डिसेंबरला काही जिल्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. -IMD Pl see IMD Updates. pic.twitter.com/Y3M0zBMY4c
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 25, 2021
राज्यात कुठं पाऊस पडणार
हवामान विभागानं 28 आणि 29 डिसेंबरसाठी यलो अॅलर्ट जारी केले आहेत. राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना,जळगाव, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह,हलका ते मध्यम पाऊस व वारा (30-40 किमी ताशी) शक्यता आहे. 27 ला विर्दभात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
29 डिसेंबरला विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो.
इतर बातम्या:
Chanakya Niti : या 4 स्थितीमध्ये निघून जाणेच फायदेशीर, मान-सन्मान दोघांचेही नुकसान होऊ शकते!
Weather Forecast imd predicted unseasonal rain viradbha and Marathwada on 28 and 29 December