Weather Forecast : कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, IMD कडून यलो ॲलर्ट जारी

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे.

Weather Forecast : कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, IMD कडून यलो ॲलर्ट जारी
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 10:50 AM

मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं 15 नोव्हेंबरला चार दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जारी केला होता. अरबी समुद्रातील हवामानाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण , कणकवली, देवगड, वैभववाडी या ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. कोल्हापूरमधील चंदगड, शिरोळ,नृसिंहवाडी, नांदणी ,जयसिंगपूर, शिरढोण, कुरूंदवाड , दत्तवाड आजरा, मलिग्रे, उतुर आणि गवसेमध्ये पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, कोर्टी, केम, केतूर, जेऊर, साळसे, उमरड, अर्जुननगर मध्येही पाऊस झाला आहे.

गेल्या 24 तासात कुठे पाऊस पडला?

रत्नागिरीमध्ये 38 मिमी, वेंगुर्ला, नांदेड, सातारा, कोल्हापूर, बारामती, पुणे, सांगलीमध्ये पावसानं हजेरी लावली.

वाशिममध्ये पावसाची हजेरी

वाशिमच्या मंगरुळपिर शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसाचा रब्बीच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नांदेड शहरात जोरदार पाऊस

नांदेड शहरात रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे रात्री उशिरा घरी जाणाऱ्यांची पंचायत झाली होती. शिवाय शहरातील अनेक रस्त्यावरील खड्यांमध्ये पाणी साचले होते. ध्या थंडीचे दिवस असून त्यात पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात बदल झाला असून याचा परिणाम आरोग्य होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

Amravati Curfew | अमरावतीत परिस्थिती नियंत्रणात, इंटरनेट सेवा शुक्रवारपर्यंत बंद, अकोटमध्येही संचारबंदी कायम

Ankita Lokhande | बॉयफ्रेंडसोबत सात फेरे घेण्याआधी अंकिता लोखंडेची जबरदस्त बॅचलर पार्टी, पाहा फोटो…

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.